शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:09 IST

बँकेत जाळपोळ करणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरार आहे

वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर): येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 20 एप्रिल रोजी पहाटे 3.24 वाजता चौघांनी कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी लावलेल्या आगीत संपूर्ण बँक जळून सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी बँकेच्या गेट बाहेर एक कार  (MH-14 BX-7988) आढळून आली होती. गुन्हे शाखेने हाच धागा पकडून तपास करत या संपूर्ण घटनेचा उलगडा केला. या मागे धक्कादायक कारण असल्याचे पुढे आले आहे.

फिर्यादी बजरंगलाल ठाका (बँक मॅनेजर) यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी गु.र.क्र. 193/2025, भा.दं.वि. कलम 305, 331(4), 62, 326(जी), 324(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिष वाघ व सपोनि पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. बँकेच्या बाहेर आढळून आलेल्या गाडीच्या तपासणीत डिक्कीमध्ये वेगवेगळ्या बनावट नंबर प्लेट आढळल्या. यावरून गाडी मालेगाव येथील ओम साई ऑटो कन्सल्टिंगमधून खरेदी झाली असून विक्रीदरम्यान खरेदीदाराची चुकीची माहिती नोंदवली गेल्याचे निष्पन्न झाले.

बँकेने गुन्हा दाखल केल्याने घेतला बदलातांत्रिक तपासानंतर 21 एप्रिल रोजी अक्षय ज्ञानेश्वर कराळे (रा. करंजगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भरत शिवाजी कदम या व्यक्तीने बँकेवर रागापोटी हा कट रचल्याचे त्याने उघड केले. भरत शिवाजी कदम ( रा. विरगाव) याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेने बनावट कागदपत्रा आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी वैजापुर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा राग व बदला घेण्यासाठीच भरत कदम याने हा सर्व प्लॅन आखल्याचे कराळे याने सांगितले. पाच आरोपी अटकेत, एक फरारया प्रकरणात अक्षय ज्ञानेश्वर कराळे (28, करंजगाव) , भरत शिवाजी कदम ( विरगाव), सचिन सुभाष केरे (25, गवळी शिवरा ), वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे (27, गवळी शिवरा), धारबा बळीराम बिराडे (31, अंधोरी), आणि आप्पा बालाजी बने (अंधोरी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आप्पा बने हा अद्याप फरार असून तो बँकेच्या आगीत भाजल्याची माहिती आहे. 

यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोह भागीनाथ आहेर, पोह विठ्ठल डोके, पोह वाल्मीक निकम, पोह शिवानंद बनगे, पोना अशोक वाघ, पोना दिपक सुरोशे, पोअं. राहुल गायकवाड, पोअं. योगेश तरमाळे, यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीbankबँक