शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

९७ टक्के मतदान

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

औराद शहाजानी / शिरूर अनंतपाळ / चाकूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या औराद शहाजानी, शिरूर अनंतपाळ

औराद शहाजानी / शिरूर अनंतपाळ / चाकूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या औराद शहाजानी, शिरूर अनंतपाळ आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले. या तीन्ही बाजार समितीत सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, सोमवारी सकाळी ८ वाजता ज्या-त्या बाजार समितीच्या सभागृहांत मतमोजणी होणार आहे.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीची बाजार समिती सर्वात मोठी आहे. या बाजार समितीतील १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ५१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, ९७ टक्के मतदान झाले आहे. बाजार समिती स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ५८ गावांतील कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या सोसायटी मतदारसंघातून ११ जागांसाठी ग्रामपंचायत ४, आणि व्यापारी मतदारसंघातून २ अशा एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. औराद, कलमुगळी, अंबुलगा (बु.) येथे मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायत मतदारसंघातून ५१४ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ४६४ मतदारांपैकी ४५३, व्यापारी मतदारसंघातून १०५ मतदारांपैकी १०४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. १०८३ पैकी १००८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी ग्रामपंचायत मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी.एम. भुसे यांनी सांगितले. शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी तर औराद शहाजानी बाजार समितीच्या १७ जागांसाठी व चाकूर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले आहे. (वार्ताहर)शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९६ टक्के मतदान झाले. एकूण ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बाजार समितीची पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यामुळे मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ४शिरूर अनंतपाळ येथे ३ व साकोळ, उजेड, हालकी, येरोळ, हिप्पळगाव येथील प्रत्येकी दोन अशा एकूण १३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळी बाजार समितीच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी चार टेबल असून, १७ अधिकारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघाची मतमोजणी उद्या होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेषेराव गोगले यांनी सांगितले.चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार विनायकराव पाटील भाजप-सेना पॅनलच्या १६ जागा यापूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत. १८ पैकी १६ जागा बिनविरोध आल्याने ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले. विनायकराव पाटील पॅनलकडून प्रशांत पाटील, अशोक नागिमे तर दुसऱ्या पॅनलमधून तुकाराम बागलगावे व दिलीप येणगे यांच्यात लढत झाली आहे. रविवारी सकाळी या दोन जागांसाठी ५९४ मतदारांपैकी ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अटीतटीची लढत झाल्याने चाकूर तालुक्याचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४३ आणि औराद शहाजानी बाजार समितीच्या १७ जागांसाठी ५१ तर चाकूर बाजार समितीच्या दोन जागांसाठी चार अशा एकूण ९८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.