93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:57 IST2025-06-17T12:55:35+5:302025-06-17T12:57:18+5:30

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील एका सोन्याच्या दुकानातील या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 17 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

93-year-old grandfather fulfills grandmother's dream; This jeweler's act won hearts, video goes viral | 93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल

93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर सध्या एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ज्वेलरी शॉपमधील आहे. या व्हिडिओत एका 93 वर्षीय आजोबाचे आपल्या पत्नीवरील प्रेम पाहायला मिळते. तसेच, या ज्वेलरी शॉपच्या मालकाची कृती पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला सूमारे 17 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलरी या दुकानातील आहे. गोपिका ज्वेलरी संभाजीनगरच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन होते. या व्हिडिओत दिसणारे 93 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याच्या वाट्या घेण्यासाठी दुकानात येतात. यावेळी दुकान मालक त्यांची आपुलकीने विचारपूस करतो. 


आजींकडे फक्त 1100 रुपये असतात, तर आजोबांकडे कापडात गुंडाळलेले थोडे फार पैसे असतात. पण, ज्वेलर्स त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देतो. तो म्हणतो, पैसे नका देऊ, दागिने असेच घेऊन जा. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. पण, आजोबा-आजी पैसे घेण्याची विनंती करतात. शेवटी ज्वेलरी मालक त्यांची विनंती मान्य करतो आणि त्या वृद्ध जोडप्याकडून फक्त 20 रुपये घेतो. पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यावर काय कमी पडतंय, असे तो दुकान मालक म्हटल्याचे व्हिडिओत ऐकू येते. 

दरम्यान, आजी आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीदेखील या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्वेलर्सने दाखवलेला मनाचा मोठेपणाबद्दल नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: 93-year-old grandfather fulfills grandmother's dream; This jeweler's act won hearts, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.