मराठवाड्यातील ९०० गावे श्रावणसरींनी चिंब; ४४ मंडळात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:55 IST2025-07-28T19:54:39+5:302025-07-28T19:55:06+5:30

जुलै महिन्यातील खंडानंतर पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

900 villages in Marathwada inundated by Shravana; Heavy rains in 44 mandals | मराठवाड्यातील ९०० गावे श्रावणसरींनी चिंब; ४४ मंडळात दमदार पाऊस

मराठवाड्यातील ९०० गावे श्रावणसरींनी चिंब; ४४ मंडळात दमदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावत विभागातील जवळपास आठही जिल्ह्यांना चिंब केले. विभागातील तब्बल ४४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, एका मंडळात २० गावे याप्रमाणे विभागातील ९०० गावे चिंब झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५, नांदेड जिल्ह्यातील १०, हिंगोली जिल्ह्यातील ९, जालना जिल्ह्यातील ९ आणि लातूर जिल्ह्यातील १ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

२४ तासांत हिंगोली आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. विभागात जून व जुलै महिन्याच्या तुलनेत १० टक्के पावसाची तूट आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपासून रविवारी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यात सरासरी ३२.९ मि. मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५२ मि. मी तर जालना जिल्ह्यातदेखील तब्बल ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वात कमी १५ मि.मी. पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. श्रावणात झालेल्या या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक पाऊस बरसतो आहे. जुलै महिन्यातील खंडानंतर पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मराठवाड्यातील लहान मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा जलसाठा आला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून, २७१ मि. मी. पाऊस आजवर झाला आहे. ४० टक्के हे प्रमाण आहे. ३४० मि. मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ७० मि.मी. पावसाची तूट अद्याप आहे.
----
चोवीस तासांतील पाऊस
छत्रपती संभाजीनगर - ३९.२ मिमी.
जालना - ४७.१ मिमी
बीड - १९.६ मिमी
लातूर - २५.७ मिमी
धाराशीव - १६.९ मिमी
नांदेड - ३८.५ मिमी
परभणी - १५.५ मिमी
हिंगोली - ५२.४ मिमी
-----------
एकूण - ३२.९ मिमी

अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा : लाडगाव (७१ मिमी), चौका (८४ मिमी), शेकटा (८६ मिमी), कन्नड (८७ मिमी), चापानेर (८७ मिमी), चिकलठाण (८७ मिमी), पिशोर (७७ मिमी), नाचनवेल (६५ मिमी), चिंचोली (७७ मिमी), करंजखेड (७७ मिमी), सुलतानपूर (८२ मिमी), फुलंब्री (७१ मिमी), पीरबावडा (६७ मिमी), वडोदबाजार (८३ मिमी), बाबरा (९५ मिमी)
जालना जिल्हा : हसनाबाद (७१ मिमी), शेवली (६६ मिमी), अंबड (८८ मिमी), जामखेड (७९ मिमी), आष्टी (६६ मिमी), बदनापूर (७९ मिमी), शेलगाव (७९ मिमी), दाभाडी (७१ मिमी), रोशनगाव (७९ मिमी)
लातूर जिल्हा : पानगाव (८१मिमी).
नांदेड जिल्हा : नांदेड (७७ मिमी), वासरानी (८१ मिमी ), विष्णुपुरी (७९ मिमी), लिंबगाव (८४ मिमी), तरोडा (८८ मिमी), नाळेश्वर (८२ मिमी ), भोकर (६६ मिमी), मोघली (६६ मिमी), मुदखेड (८८ मिमी), बारड (८१ मिमी).
हिंगोली जिल्हा : वसमत (१०५), हयातनगर (१०५), गिरगाव (६६), हट्टा (८०), टेंभुर्णी (१०५), औंढा (६५), सलाना (६५), जवळा (७३), पानकन्हेरगाव (६५),

Web Title: 900 villages in Marathwada inundated by Shravana; Heavy rains in 44 mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.