शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याबाजारात जाणारा ९ टन तांदूळ जप्त

By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST

अंबड : अंबड, जालना व इतर ठिकाणी सार्वजनिक वितरणासाठी देण्यात आलेला ९ टन तांदूळ पोलिसांनी शहागड येथे गोंदी पोलिसांनी सापळा लावून पकडला.

अंबड : अंबड, जालना व इतर ठिकाणी सार्वजनिक वितरणासाठी देण्यात आलेला ९ टन तांदूळ पोलिसांनी शहागड येथे गोंदी पोलिसांनी सापळा लावून पकडला. १४ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एक आयशर व स्कॉर्पियोे जप्त केली. याप्रकरणी गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड येथे विक्रीेसाठी जालना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ एक टोळी घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना एका खबऱ्याने दिली. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख व पोलिसांनी सापळा लावला. मात्र अंबड पोलिसांना गुंगारा देवून आयशर (एम.एच. २० ए.टी. ९५९२) शहागडकडे गेल्याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. गोंदी पोलिसांच्या पथकाने आयशर अडवताच स्कॉर्पिओ जीपमधून (एम.एच.१५ डी.सी. ३५९३) जाणारा आरोपी शेख अथर शेख अक्तर हा पोलिसांना धमकावू लागला. मात्र उपविभागीय पोलिस अधीकारी विक्रांत देशमुख व सहाय्यक निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्याला पोलिस खाक्या दाखवताच तो वठणीवर आला. त्याच्या ताब्यातून ९ टन तांदूळासह ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती घोरबांड यांनी दिली. आपेगाव (ता.अंबड) येथील बबन मुरलीधर चौधरीसह चालक शेख अक्तर विरोधात गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)