मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:37 IST2025-05-14T15:36:24+5:302025-05-14T15:37:20+5:30

इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी विषयांत उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी जास्तच

9 thousand students failed in Mayaboli Marathi; Number in Chhatrapati Sambhajinagar division | मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत विभागात तब्बल ९ हजार ४८६ विद्यार्थी मायबोली मराठी विषयात नापास झाले. तरीही इंग्रजीपेक्षा मराठी विषयांत उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी जास्तच आहे.

दहावीत ३६ विषयांमध्ये विभागात १ लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ लाख ५६ हजार २२५ विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठीची निवड केली होती. यातील ९३.९३ टक्के म्हणजे १ लाख ४६ हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ९ हजार ४८६ विद्यार्थी मराठीत नापास झाले.

तर १ लाख ७३ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी द्वितीय-तृतीय भाषा म्हणून इंग्रजीची निवड केली होती. यापैकी ९३.७९ टक्के म्हणजे १ लाख ६२ हजार ६०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १० हजार ७६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
याबरोबरच १ लाख ४५ हजार हजार ७९० विद्यार्थ्यांनी द्वितीय-तृतीय भाषा म्हणून हिंदी विषयाचा पेपर दिला होता. यातील ९४.२३ टक्के म्हणजे १ लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ८ हजार ४०७ विद्यार्थी नापास झाले.

विषयानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
विषय - टक्केवारी

- मराठी प्रथम भाषा : ९३.९३ टक्के
- हिंदी प्रथम भाषा : ८२.२५ टक्के
- इंग्रजी प्रथम भाषा : ९८.५८ टक्के
- उर्दू प्रथम भाषा : ९४.८५ टक्के
- हिंदी द्वितीय-तृतीय भाषा : ९४.२३ टक्के
- मराठी द्वितीय-तृतीय भाषा : ९६.२३ टक्के
-इंग्रजी द्वितीय-तृतीय भाषा : ९३.७९
- संस्कृत द्वितीय-तृतीय भाषा : : ९९.२३ टक्के

१६ विषयांचे विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण
उर्दू द्वितीय-तृतीय भाषा, पाली, अरेबिक, फिजिओलाॅजी हायजिन अँड होम सायन्स, इलेक्ट्रिक टेक्नाॅलाॅजी, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, पाॅवर कंजुमर एनर्जी मीटर, फिजिकल ॲक्टिव्हिटी, ॲपरेल्स स्विंग मशीन ऑपरेटर, मायक्रो फायनान्स, हिंदी-उर्दू, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, असिस्टंट ब्युटी थेरपीस्ट, टुरिझम ॲण्ड हाॅस्पिटॅलिटी, ॲग्रीकल्चर आणि हेल्थ केअर या १६ विषयांचे विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण झाले.

Web Title: 9 thousand students failed in Mayaboli Marathi; Number in Chhatrapati Sambhajinagar division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.