सेनगावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर ९ लाख रुपये दंडाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 10:57 IST2018-04-10T20:36:16+5:302018-04-11T10:57:19+5:30
तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.

सेनगावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर ९ लाख रुपये दंडाची कारवाई
सेनगाव (हिंगोली ) : येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.
सेनगाव तहसील कार्यालयाचा गौण खनिज पथकाने मगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारी तिन वाहने पकडले. पथकाने एम.एच.३८ डी.९१७७,एम.एच. २६ ए.डी. ४९७९ असे दोन टिप्पर साखरा -कापडसिनगी रोडवर पकडले.तर आजेगाव परिसरात एक टिप्पर पकडले. पकडलेल्या वाहना पैकी दोन वाहने सेनगाव तहसील कार्यालयात तर एक वाहन गोरेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले .या तीन हि टिप्पर वर तहसीलदार पाटील यांनी ९ लाख ५२८० दंडात्मक कारवाई केली आहे.या कारवाई त नायब तहसीलदार अशोक भोजणे,अवल कारकुन बालाजी रेड्डी,लिपिक लक्ष्मण गायवाळ, तलाठी महेश सावरगाकर,राजकुमार शेळके,तलाठी बोडखे, खंदारे आदी चा समावेश होता.