शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

६६ गावांना ९ कोटी रुपयांचे वाटप

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपिटीमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपिटीमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी तालुक्यातील ४४ हजार खातेदारांना १७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी ६६ गावांमध्ये ९ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. तालुक्यात १०६ गावांचा समावेश असून ६६ गावांना ९ कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. उरलेल्या ३८ गावांसाठी ८ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत टप्प्याटप्याने वाटप केली जाणार आहे. तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीत सापडल्यामुळे पूर्णत: हतबल झाला होता. परंतु, शासनाने तत्काळ गांभीर्य लक्षात घेऊन या शेतकर्‍यांना अनुदान वाटप करुन सावरण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील ४४ हजार खातेदार शेतकर्‍यांना या अनुदानाचा थोडाबहुत फायदा झाला. या तालुक्यात गारपिटीचे अनुदान तत्काळ आले. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या सोयीने अनुदानाचे वाटप करीत आहे. बँकेने लवकरात लवकर अनुदान वाटप करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. तालुक्यातील शेतकरी गारपिटीमुळे त्रस्त झाला असून त्यांना कोणतीही अडचण येऊ न देता ६६ गावांना ९ कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. उरलेल्या ३८ गावांसाठी ८ कोटी रुपये आले असून ते तत्काळ बँकेत जमा करण्यात येत आहेत. तालुक्यातील १०६ गावांतील ४४ हजार खातेदार शेतकर्‍यांना या अनुदानाचा फायदा होणार असल्याचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या ३८ गावांना ८ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून हे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत टप्प्या टप्प्याने वाटप केले जाणार आहे. अनुदान मंजूर झालेली गावे अशी- बडवणी/ आनंदनगर, भांबरवाडी, धनगरमोहा, ढवळकेवाडी, ढेबेवाडी, डोंगरगाव, डोंगरपिंपळा, गुंजेगाव, गौंडगाव, हरंगूळ, इसाद, कड्याची वाडी, कातकरवाडी, खादगाव, खळी, खंडाळी, खोकलेवाडी, कोद्री, महातपुरी, मानकादेवी, मसला, नरळद, निळा नाईक तांडा, पडेगाव, पिंपळदरी, पिंपरी, पोटा, पोखर्णी वा., सांगळेवाडी, शंकरवाडी, शेंडगा, सुप्पा ज., उखळी बु., उंबरवाडी, उंडेगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, वागदरा.