शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीचे ९ कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:56 IST

महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्रस्ताव पाठविले असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्रस्ताव पाठविले असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़मागील वर्षीचे दहा कोटी रूपये योग्य नियोजनाअभावी परत गेल्यानंतर चालू वर्षाच्या निधीतून कामांना मंजुरी देण्यात आली़ जवळपास १६ कोटींची ही कामे मंजूर झाल्यानंतर या कामांबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या़ शिवसेनेच्या मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनी दलित वस्तीची कामे नियमबाह्यरित्या दिल्याची तक्रार केली होती़ त्यात दलित वस्ती असलेले मूळ प्रभाग सोडून दुसºयाच प्रभागात दलित वस्ती नसलेल्या ठिकाणी निधी दिल्याचा आरोपही केला होता़ सभागृह नेत्याच्या एकाच प्रभागात दोन कोटींची कामे दलित वस्तीतून करण्यात आल्याची बाबही निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे या कामांना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्थगिती दिली होती़या विषयावर आ़ अमिता चव्हाण यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला़ पुढे पालकमंत्र्यांनी कामावरील स्थगिती उठवली असली तरी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाºयांनी दलित वस्ती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली़ या सर्व प्रकारामुळे महापालिकेनेही पुन्हा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडून दलितवस्ती कामांची चौकशी केली़ त्यात अनेक कामे ही झालेली असतानाही पुन्हा नव्याने समाविष्ट केल्याचा अहवाल सादर केला होता़ या अहवालानंतर मनपाने आपली बाजू मांडल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले़