शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसाला ८ हजार लिटर्स दुधाची घट

By admin | Updated: February 2, 2016 00:27 IST

बाळासाहेब जाधव , लातूर दुष्काळी परिस्थितीमुळे पशूधनास चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात घट होते़ परंतु, पावसाळ्यापासूनच घट आहे़

बाळासाहेब जाधव , लातूरदुष्काळी परिस्थितीमुळे पशूधनास चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात घट होते़ परंतु, पावसाळ्यापासूनच घट आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सध्या दिवसाला ८ हजार लिटर्सची घट होत आहे़ त्यामुळे यातील कालावधीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने दूध उत्पादकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे़ ७ लाख ६४ हजार पशुधनासाठी ४ लाख ५० हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे हा ही चारा अपुरा पडत असल्याने दूध उत्पादकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे़ उपलब्ध चारा हा तीन महिने पुरेल एवढाच असल्याने आहे त्या चाऱ्यालाच पूरवणी करुन वापरण्याची वेळ दूध उत्पादकावर आली आहे़ २०१२-१३ मध्ये प्रतीदिन ४४ हजार ६१० लिटर्स दूधाचे उत्पादन प्रतीदिन होत होते़ २०१३-१४ मध्ये पर्जन्यमान बरे असल्याने ५२ हजार ४८० लिटर्स प्रतिदिन दूधाचे उत्पादन मिळू लागले़ २०१४-१५ मध्ये पुन्हा पर्जन्यमानात घट झाल्यामुळे प्रतीदिन दुध उत्पादनाचा आकडा ४७ हजार ६४८ लिटर्सवर आला आहे़ पुन्हा याही वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने २०१५-१६ या चालू वर्षाच्या कालावधीत प्रतीदिन ३९ हजार २३६ लिटर्स दूध उत्पादन होत आहे़ गेल्या चार वर्षाच्या तुलनेत दिवसाकाठी ८ हजार लिटर्सची दूध उत्पादनात घट होत असल्याचे समोर आले आहे़ त्यातच तीन महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याने यापुढील कालावधीत दूध उत्पादनात आणखी घट होणार असल्याने शेतकरी व दूध उत्पादकातून चिंता व्यक्त केली जात आहे़