शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरसाठी ७६ केंदे्र; आज मतदान

By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST

लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे.

लातूर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत तब्बल २३ उमेदवार रिंगणात राहिले असून, लातूर जिल्ह्यात मतदानासाठी ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली असून, शुक्रवारी रिंगणातील २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभरात ७६ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी ७ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहेत. २००८ च्या निवडणुकीत जिल्ह्यात ४० हजार ७५१ मतदार होते. त्यात यावेळी साडेअकरा हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. एकूण ५२ हजार २३२ पदवीधरांना यावेळी मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यापैकी ७ हजार ६४ स्त्री मतदार आहेत. तुलनेने पुरुष मतदारांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात ४५ हजार १६८ पुरुष मतदार आहेत. मतदारांना बॅलेट पेपर पुरविण्यात येणार असून, त्यावर स्केच पेनद्वारे पसंती क्रमांक दर्शवायचा आहे. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. मतदारांना मतदारयादीत आपले नाव शोधण्यासाठी आॅनलाईन सर्च इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लातूर.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जाऊन यादीतील नाव शोधता येईल. तसेच आपला यादीतील क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता याबाबीही आॅनलाईन जाणून घेता येतील. इतकेच नव्हे तर पोलचिट सुद्धा प्रशासनाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येत आहे. मतदारांनी अडचणीसंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी खपले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा काम पाहत आहेत.