शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

७ लाखांचा गुटखा, १०० किलो खवा जप्त

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

औरंगाबाद : गुजरातमधून आलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आणि १०० किलो खवा जप्त केला.

औरंगाबाद : गुटखाबंदी असताना औरंगाबादेत विक्री करण्यासाठी गुजरातमधून आलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आणि नियमांना तिलांजली देत आणलेला १०० किलो खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने टॅ्रव्हल्स बसचा पाठलाग करून रविवारी जप्त केला. अन्नसुरक्षा निरीक्षक गजानन गोरे यांनी सांगितले की, सकाळी गुजरातमधून आलेल्या एका ट्रॅव्हल्स बसला (क्रमांक जीजे-०१ सीटी- ६०९२) आम्ही कन्नडजवळ थांबण्याचा इशारा केला. मात्र, बसचालकाने बस थांबविली नाही. त्यानंतर आम्ही तेथून बसचा पाठलाग सुरू केला. शरणापूर फाट्याजवळ बस अडविण्यात आली. त्यावेळी बसची झडती घेतली असता बसमध्ये बेकायदेशीरपणे आणलेला १०० किलो खवा आढळला. तसेच बसच्या टपावर लपवून शहरात आणला जात असलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आढळला. यात तंबाखू असलेला रोशनी, बाबा गुटखा, रजनीगंधा पान मसाला आदी गुटख्यांचा समावेश आहे. दुग्धजन्य खवा आणि इतर अन्नपदार्थांची वाहतूक करण्यासंदर्भात नियमावली आहे. वातानुकूलित यंत्रणेत तसेच ज्या वाहनातून वाहतूक करणार आहेत, त्यास अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घ्यावा लागतो. मात्र, खवामालक आणि बसचालकाने कोणताही परवाना घेतला नाही, तसेच स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत. त्यामुळे बसमधील १०० किलो खवा ताब्यात घेण्यात आला. हा खवा सिल्लोड येथील व्यापाऱ्याच्या नावाने शहरात आला होता. त्याचा शोध घेणे सुरू असल्याचे निरीक्षक गोरे यांनी सांगितले. बसचालक सरदारसिंग राठोड (रा. उदयपूर, राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.