शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ६०० जणांचे धर्मांतर

By admin | Updated: February 8, 2016 00:24 IST

बीड : विविध जाती-धर्मातील ६०० जणांनी रविवारी येथे एकाच वेळी धर्मांतर करून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. सत्यशोधक समाज महासंघाच्या पुढाकारातून हा धम्मदीक्षा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

बीड : विविध जाती-धर्मातील ६०० जणांनी रविवारी येथे एकाच वेळी धर्मांतर करून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. सत्यशोधक समाज महासंघाच्या पुढाकारातून हा धम्मदीक्षा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. येथील सामाजिक न्यायभवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भन्ते उपगुप्त महाथेरो, सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष जी.एस. कांबळे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बोधनकर, बाबासाहेब अहिरे, प्रा. दादासाहेब जोगदंड, डॉ. जी. के. डोंगरगावकर, डी. एस. नरसिंगे, डॉ. दिलीप खंदारे, लक्ष्मीकांत शिंदे, संदीप उपरे आदी मंचावर उपस्थित होते. भन्ते उपगुप्त महाथेरो यांनी धर्मांतर करणाऱ्या ६०० जणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. यावेळी २२ प्रतिज्ञा देण्यात आल्या. धम्मांतर करणाऱ्यांमध्ये दलित समाजातील विविध जातींमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. हे धर्मांतर करताना कोणालाही बळजबरी केलेली नाही. ज्या कुटुंबियांनी धर्मांतर केले, ते स्वत:हून आल्याचे सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष जी.एस. कांबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष धर्मराज मुजमुले, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य संघटक अमरसिंह ढाका, अनिल गायकवाड, अ‍ॅड. किशोर कसबे, सतीश कसबे यांनी परिश्रम घेतले.बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटी-बेटी व्यवहार केले जातील, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही आनंदराज आंबेडकर यांनी दिली. समता आणि बंधुता फक्त बौद्ध धम्मात आहे. त्यामुळे इतरधर्मीय बौद्ध धम्माकडे आकर्षित होत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)