शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

६ लाखांचे बनावट खत टुणकी येथे पकडले

By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST

लोणी खुर्द : ओम फर्टिलायझर कंपनीचे सम्राट या नावाचे सहा लाख रुपये किमतीचे बनावट खत शेतकर्‍यांना विनापरवाना विक्री करताना बुधवारी वैजापूर तालुक्यातील टुणकी येथे पंचायत समितीच्या पथकाने पकडले

 लोणी खुर्द : नाशिक जिल्ह्यातील कामटवाडा येथील ओम फर्टिलायझर कंपनीचे सम्राट या नावाचे सहा लाख रुपये किमतीचे बनावट खत शेतकर्‍यांना विनापरवाना विक्री करताना बुधवारी वैजापूर तालुक्यातील टुणकी येथे पंचायत समितीच्या पथकाने पकडले. सात दिवसांपूर्वी टुणकी गावाजवळ असेच ११ टन बनावट खत पकडण्यात आले होते, त्यामुळे परिसरातील शेतकरी सावध होऊन आपण घेतलेले खत बनावट तर नाही ना, या संभ्रमात पडले व त्यांनी कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून टुणकी येथे सध्या खतविक्री चालू असल्याची माहिती दिली. लगेच औरंगाबाद येथील जिल्हा कृषी अधिकार्‍यांसह तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी टुणकी, तलवाडा, अंचलगाव येथे सहा लाख रुपये किमतीचे बनावट खत शेतकर्‍यांच्या घरात दिसून आले. त्यावेळी ओम फर्टिलायझर कंपनीचे खत विक्रेते मारकड वासुदेव हिमणे, रा. मोहरी, भंडारा व नरेंद्र प्रेमलाल लांजेवार, रा. गोंदिया यांनाही टुणकी येथे रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वी पकडण्यात आलेले धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील शिव अ‍ॅग्रो बायोटेक इंडस्ट्रीज कंपनीचे बनावट खत पकडण्यात आले होते. त्यातील नरेंद्र लांजेवार हा आरोपी आहे. त्यामुळे आज पकडलेली कंपनी वेगळी व सात दिवसांपूर्वी पकडलेली खताची कंपनी वेगळी आहे; मात्र त्यातील नरेंद्र लांजेवार हा आज रोजी टुणकी येथे खत विक्रीसाठी आणखी दोन साथीदारांसह वेगळ्या कंपनीचे खत घेऊन उपस्थित झाला. सात दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या आरोपीवर कृषी विभागाने कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे आरोपीने लगेच दुसर्‍या कंपनीचे खत आणून व माणसे बदलून विक्री सुरू केली. वेळीच कृषी विभागाने या आरोपीवर गुन्हा दाखल केला असता तर शेतकर्‍यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली नसती, असे शेतकर्‍यांनी सांगितले. खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत व संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार अशोक सोकटकर करीत आहेत. यावेळी सीताराम आसाराम कोलते, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी मुनीर शेख, एच.आर. बोयनर, कृषी विस्तार अधिकारी प्रमोद कुसनेनिवार, खत निरीक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)