शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

५५ सायकलींचे मालक सापडेनात !

By admin | Updated: August 28, 2016 00:18 IST

लातूर : शहर व जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या सायकली चोरणाऱ्या टोळीतील एकास गंगापूर

लातूर : शहर व जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या सायकली चोरणाऱ्या टोळीतील एकास गंगापूर येथून शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ५५ सायकलींच्या मालकांचा शोध अद्यापही लागला नाही़ पाच दिवसानंतरही सायकलींचा तिढा सुटला नाही. लातूर तालुक्यातील गंगापूर येथील अतुल वलसे या चोरट्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल ५५ सायकली जप्त केल्या़ मात्र, सायकल चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे, चोरीतील ५५ सायकलींची विक्री एकाच गावात करण्यात आली आहे़ जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने सायकलींची त्या-त्या पोलिस ठाण्यात हद्दीत चोरी झाली आहे. जिथे गंभीर गुन्ह्यांची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही, तिथे आपल्या सायकलींची दखल पोलिस घेणार का? याबाबत तक्रारदारांच्या मनात संशय असल्यामुळे ते पुढे येत नाहीत़ सायकल चोरीच्या घटना किरकोळ बाब म्हणून पोलिसांचे दुर्लक्ष होते़ त्यामुळे या चोरट्यांचे मनोबल वाढत आहे़