शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५२५ बसेसची चाके थांबली

By admin | Updated: December 18, 2015 00:02 IST

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़ कोणत्याच आगारातून बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली़ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात त्रुटी असून अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत़ यासंदर्भात इंटकने अनेकवेळा पाठपुरावा करून देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी संप पुकारला़ बहुतांश प्रवाशांना संप असल्याचे माहिती नसल्याने बसस्थानकापर्यंत येवून पुन्हा परतावे लागले़ संपामुळे प्रवाशांचे हाल झाले़ नांदेड आगारातून पहाटे ४़१५ वाजता नांदेड - सोलापूर ही पहिली बस आगारातून बाहेर पडते़ मात्र पहाटे चारपासूनच कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही़ एमएसईबी कामगारांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळविण्याकरीता औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, १ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतनश्रेणीतून नियमित वेतनश्रेणीत येताना कराराचा फायदा दिलेला नाही, तो देवून वेतन निश्चिती करावी यासह ११ मागण्या इंटकने केल्या आहेत़ आंदोलनात इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे, के़ एस़ दुर्गे, जी़ एस़ सोनटक्के, एच़ जी़ सोनटक्के, बाळासाहेब मोरे, एस़ के़ शिराळे, मारोती घोरबांड, सिद्धार्थ जोंधळे यांनी सहभाग नोंवदला़ दरम्यान, मागण्यांसंदर्भात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत कोणताच तोडगा निघाला नसल्याने शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील, अशी माहिती इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱइंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली़