शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

५२ प्रकल्प अद्यापही कोरडेच

By admin | Updated: September 1, 2016 01:12 IST

उस्मानाबाद : यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी जिल्ह्यात आजवर अपेक्षित पाऊस झालेला नाही़ परिणामी जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़

उस्मानाबाद : यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी जिल्ह्यात आजवर अपेक्षित पाऊस झालेला नाही़ परिणामी जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़ तर ८६ प्रकल्पांमध्ये गाळयुक्त पाणीसाठा आहे़ तुळजापूर व मुरूम परिसरात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर ६ प्रकल्पाची पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर आहे़ प्रकल्पांची परिस्थिती, गावा-गावातील पाणीटंचाई आणि पावसाअभावी वाया जाणारी पिके पाहता सर्वांनाच मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे़ मात्र, आगामी काळात पाऊस झाला नाही तर जिल्हावासियांना यंदाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे़सलग तीन-चार वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या जिल्हावासियांना यंदा वेळेत पाऊस आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता़ जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कमी-अधिक पडणारा पाऊस आॅगस्ट महिन्यात गायब झाला़ तब्बल महिनाभर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला नाही़ प्रारंभीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या पावसात जिल्ह्यातील केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ ६ प्रकल्पांची पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे़ तर १२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा आहे़ २६ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा केवळ ९ प्रकल्पांमध्ये झाला आहे़ तर २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा ३९ प्रकल्पांमध्ये आहे़ तर तब्बल ८६ प्रकल्पात केवळ गाळयुक्त पाणीसाठा असून, ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़पाऊस पडू लागल्याने प्रशासनाने गावा-गावातील टँकर, अधिग्रहणे बंद केली होती़ परिणामी या गावातील, शहरांमधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ त्यातच उपलब्ध पाण्याचा होणारा उपसा आणि पाऊस पडत नसल्याने पाणीसाठ्यात घट होवू लागली आहे़ जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांची परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर प्रकल्प कोरडाठाक असून, तेरणा, वाघोली प्रकल्पात काही प्रमाणात गाळयुक्त पाणी आहे़ कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील खंडेश्वर हे प्रकल्पही कोरडेठाक आहेत़ भूम तालुक्यातील संगमेश्वर प्रकल्पात केवळ ०़२२१ दलघमी पाणीसाठा आहे़ बाणगंगा प्रकल्पात ०़३९५ दलघमी, रामगंगा प्रकल्पात ०़००२ दलघमी पाणीसाठा आहे़ परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी, व साकत हे प्रकल्प जोत्याखाली असून, या प्रकल्पांमध्ये गाळयुक्त पाणी आहे़ तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात ११़२०० दलघमी, हरणी प्रकल्पात ८़०९० दलघमी, खंडाळा प्रकल्पात ३़८४७ दलघमी, उमरगा तालुक्यातील जकापूर प्रकल्पात २़२१३ दलघमी, तुरोरी प्रकल्पात ०़३७८ दलघमी तर बेन्नीतुरा प्रकल्पात ७़४५२ दलघमी पाणीसाठा आहे़केवळ ११़१४ टक्के उपयुक्त पाणी४जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी ७८ प्रकल्पांमध्ये केवळ ७२़५८५ दलघमी म्हणजे ११़१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ मागील आठवड्यात ही परिस्थिती ७३़६१ दलघमी म्हणजे ११़३० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात यातील ०़१६ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे़ मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ७़५६ दलघमी म्हणजे १़१६ टक्के पाणीसाठा होता़ गतवर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती बऱ्यापैकी आहे़ मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे़पूर्ण क्षमतेने भरले १२ प्रकल्प४जिल्ह्यातील केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ यात परंडा तालुक्यातील तिंत्रज, तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी लघू पाझर तलाव, कुनसावळी, सलगरा मड्डी, व्होर्टी साठवण तलाव एक, सुरटा सा़त़दोन, जळकोट, आलीयाबाद, हंगरगाळ नळ, खंडाळा, उमरगा तालुक्यातील भिकारसांगवी, कोराळा हे १२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़