शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 23, 2014 01:38 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात सोमवारीही नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली. दिवसभरात नऊ कार्यालयांमधून १५३ इच्छुकांनी

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयात सोमवारीही नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली. दिवसभरात नऊ कार्यालयांमधून १५३ इच्छुकांनी ३२५ नामनिर्देशनपत्रे घेतली. तर पाच जणांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, कन्नड, पैठण आणि गंगापूर मतदारसंघांत हे उमेदवारी अर्ज दाखल झाले. पैठण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांनी बैलगाडी मिरवणुकीद्वारे येऊन अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कन्नड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मारोती राठोड यांनी पोलीस ग्राऊंडसमोरील प्रचार कार्यालयापासून रॅली काढून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी एक उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मोहम्मद किस्मतवाला कासीम यांनी आज पुन्हा अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी याआधी शनिवारीही एक अर्ज दाखल केला होता. तसेच औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शेख खाजा शेख किस्मतवाला यांनी उमेदवारी अर्ज भरला. गंगापूर मतदारसंघातून राम बाहेती यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत नऊ मतदारसंघांच्या कार्यालयातून एकूण ३२५ इच्छुकांनी ७१२ नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत एकूण पाच जणांचे सात अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसचे बाबासाहेब पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. पोलीस निरीक्षक सी. पी. काकडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा निनावी फोन आला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी पवार यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीअंती प्रकरणात तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.