शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापकाने केला पाच लाख रूपयांचा अपहार

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

कुंभारपिंपळगाव : बँक आॅफ महाराष्ट्रच्या कुंभारपिंपळगाव (ता.घनसावंगी) शाखेत व्यवस्थापकाने ग्राहकाच्या बँक खात्यातून ५ लाख ३ हजार २२९ रूपयांचा अपहार केला.

कुंभारपिंपळगाव : बँक आॅफ महाराष्ट्रच्या कुंभारपिंपळगाव (ता.घनसावंगी) शाखेत व्यवस्थापकाने ग्राहकाच्या बँक खात्यातून ५ लाख ३ हजार २२९ रूपयांचा अपहार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व्यापारी गोविंद व्यंकटेश जायभाये यांच्या प्रेम मोटर्स अ‍ॅण्ड अ‍ॅटोमोबाईल्स या व्यवसायिक प्रतिष्ठानचे या बँकेत खाते आहे. या खात्यावर आॅगस्ट २०१४ मध्ये ५ लाख ३८ हजार २६४ रूपयांची रक्कम जमा होती. मात्र २५ आॅगस्ट रोजी बँक खात्यातील रकमेची चौकशी केली असता खात्यावर केवळ ३५ हजार ३५ रूपयेच जमा असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे आपल्या खात्यावरून ५ लाख ३ हजार २२९ रूपये गायब झाल्याचे त्यांनी बँकेच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या शंकास्पद व्यवहाराची काहीच माहिती मिळत नसल्याने जायभाये यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे घनसावंगी न्यायालयात फौजदारी प्रक्रीया संहिता १५६ (३) नुसार खाजगी खटला दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कुंभारपिंपळगावसह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. जायभाये यांनी न्यायालयात आपली बाजू मांडून बँकेच्या व्यवस्थापकाने गैरव्यवहार केल्याचे सांगितले. न्यायालयाने सदर प्रकरणात महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक रमेश प्रेमचंद भानारकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर घनसावंगी जमादार जी.जी. मदन यांनी भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. तपास सहायक निरीक्षक सोनवणे करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली नाही. (वार्ताहर)