शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:36 PM

सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या.

औरंगाबाद : सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या. सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगर येथून एकाच रात्रीत चोरट्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ५ दुचाकी लंपास केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. दुचाकी चोरीच्या घटनेमुळे वाळूज महानगरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबीप्रमुख फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय सुखदेव सुलताने (रा. साक्षीनगर, सिडको वाळूज महानगर- १) यांनी बुधवारी त्यांची दुचाकी (एमएच-२०, सीपी-१२९८) पार्किंगमध्ये उभी केली होती. गुरुवारी सकाळी सात वाजता सुलताने यांचा भाऊ राजू हे कामानिमित्त बाहेर निघाले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दुचाकी चोरीची सोसायटीत चर्चा होताच येथील आणखी चार जणांच्या दुचाकी गायब झाल्याचे उघडकीस आले. यात भीमराव प्रधान (एमएच- २०, ईजी- ५७२०), रुकेश राऊत (एमएच - २०, सीव्ही - १२३०), गौरव कुमार (यूपी - ७९, क्यू - ४१३५), संदीप चव्हाण (एमएच - २०, ईक्यू - ७९९९) या चौघांच्या दुचाकी चोरीला गेल्या. वडगावचे माजी सरपंच महेश भोंडवे यांचीही घरासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच - २०, बीएक्स - ७७) १६ सप्टेंबरच्या रात्री चोरी गेली आहे. 

पोलिसांची रात्रीची गस्त घटलीपोलिसांनी रात्रीची गस्त वाढविताच मध्यंतरी या घटनांवर आळा बसला होता; परंतु तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाली आहे. सध्या पोलिसांचे अधिक लक्ष गणेशोत्सवातील घटना-घडामोडीवर आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, रांजणगाव,जोगेश्वरी आदी परिसरात  पोलिसांची गस्त कमी झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन दुचाकीचोर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

वाहनधारकांत भीतीचे वातावरणस्थानिक पोलीस चोरीच्या घटना थांबविण्यात अपयशी ठरत आहेत. कर्मचारी वर्ग कमी असल्याने पोलिसांचा रात्रीचा पहारा कमी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. चोरटे काही विशिष्ट प्रकारच्या दुचाकीलाच लक्ष करीत आहेत. या वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरtheftचोरीWalujवाळूजAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस