शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख लोकसंख्येसाठी ४ कर्मचारी

By admin | Updated: May 9, 2016 00:05 IST

औरंगाबाद : सेफ सिटी उपक्रमांतर्गत पोलीस आयुक्तांनी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

औरंगाबाद : सेफ सिटी उपक्रमांतर्गत पोलीस आयुक्तांनी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाल्यावर त्यांना घरपोच दंड ठोठावण्यात येत आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी पोलिसांनी फक्त चार कर्मचारी नेमले आहेत. दिवसभर नागरिकांचे पत्ते शोधणे आणि दंडाची पावती देण्यात कर्मचारी घामाघूम होत आहेत.‘सेफ सिटी’ उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून महापालिकेने शहरातील ३० चौकांमध्ये तब्बल ५० पेक्षा अधिक कॅमेरे बसविले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.शहरात मंगळसूत्र चोरीचे प्रमाण बरेच वाढले होते. मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनत चालला होता. वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश बसावा यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाने ३० चौकांमध्ये ५० पेक्षा अत्यंत दर्जेदार कॅमेरे बसविले. दहा ‘पीटीझेड’ कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पिक्चर कितीही झूम केले तरी ते फाटत नाही. सर्वसामान्यपणे चेहरा दिसतो. ‘फिक्स’ कॅमेऱ्यांची संख्या तब्बल ३० आहे. ‘पॅनोरमा’ कॅमेरे दहा बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे १८० डिग्रीमध्ये फिरत असतात. सीसीटीव्हीचे फुटेज पोलीस आयुक्तालयात सेफ सिटीसाठी निवडण्यात आलेले कर्मचारी दिवसभर पाहत असतात.हेल्मेटचा वापर न करणारे नागरिक, सीट बेल्ट न वापरणारे नागरिक, सिग्नल तोडणारे वाहनधारक यांचे चित्रण दररोज होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाचे फोटो काढण्यात येतात. फोटोत वाहनधारकांचा चेहरा, वाहन क्रमांक ठळकपणे दिसतो. आरटीओ कार्यालयातून वाहनधारकांचे नाव आणि पत्ता काढण्यात येतो. या माहितीच्या आधारावर १०० रुपयांची पावती तयार करण्यात येते. सेफ सिटीचे कर्मचारी या पावत्या वाहतूक शाखेकडे पाठवून देतात.