शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३७ आई-बाबांची निर्वाह न्यायाधिकरणात धाव

By admin | Updated: December 3, 2014 01:16 IST

हणमंत गायकवाड ,लातूर मुलं सांभाळ करीत नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील ३७ आई-बाबांनी उपविभागीय निर्वाह न्यायाधिकरणात धाव घेतली असून, त्यातील न्यायाधिकरणाने


हणमंत गायकवाड ,लातूर
मुलं सांभाळ करीत नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील ३७ आई-बाबांनी उपविभागीय निर्वाह न्यायाधिकरणात धाव घेतली असून, त्यातील न्यायाधिकरणाने २३ प्रकरणांचा निकाल दिला असून, संबंधित मुलांना आई-वडिलांचा निर्वाह खर्च करा, असे निर्देश दिले आहेत़ अद्यापी १४ प्रकरणांचा निकाल लागला नसून, या प्रकरणातील आई-बाबांना निर्वाह खर्चाची प्रतीक्षा आहे़
महाराष्ट्र शासनाने आई-वडील व जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर न्यायाधिकरण स्थापन केले आहे़ तर उपविभागीय स्तरावर उपन्यायाधिकरणाची स्थापना केली आहे़ २०१० पासून जिल्हा व उपन्यायाधिकरण कार्यरत झाले आहेत़ त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील ३७ आई-बाबांनी उपविभाग न्यायाधिकरणात मुलं सांभाळत नसल्याची तक्रार केली आहे़ लातूर उपविभागात एकूण १३ आई-वडीलांनी मुलं सांभाळत नसल्याची तक्रार केली आहे़ २०१० ते माहे जून २०१४ अखेर या तक्रारी दाखल झाल्या असून, १३ पैकी १० प्रकरणांत उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधीत मुलांना आई-वडिलांचा निर्वाह खर्च करा, असे निर्देश दिले आहेत़ निकालाच्या प्रारंभी मुलं तसेच तक्रारकर्त्या आई-वडिलांच्या सुनावण्या झाल्या असून, मुलांच्या आर्थिक क्षमतेनुसार निर्वाह खर्च देण्याचे निर्देश या निकालात दिले आहेत़ उर्वरित तीन प्रकरणाच्या सुनावण्या सुरुच आहेत़
निलंगा येथील उपविभागीय न्यायाधिकरणात ९ आई-वडिलांनी तक्रार केली असून, या ९ ही प्रकरणात न्यायाधिकरणाने मुलांच्या सुनावण्या घेऊन आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे निर्देश दिले आहेत़
औसा उपविभागातही ४ तक्रारी दाखल झाल्या असून, या ४ ही तक्रारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निकाली काढून संबंधित मुलांना निर्वाह खर्च अथवा सांभाळ करण्याचे निर्देश दिले आहेत़ २०१० ला हे न्यायाधिकरण स्थापन झाले़ त्यानंतर लातूर - १३, उदगीर - ११, औसा - ४ आणि निलंगा - ९ अशा एकूण ३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़
या ३७ पैकी २३ प्रकरणांत संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे़ अद्यापही १४ प्रकरणांत आई-बाबांना निर्वाह खर्च मिळण्याची प्रतीक्षा आहे़ ४
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आई-वडील व जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ या कायद्याची अमलबजावणी सुरु आहे़ या कायद्यात जेष्ठ नागरिकांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद केली आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायाधिकरणात संबंधीत आई-वडिलांची व त्यांच्या मुलांची सुनावणी घेण्यात येते़ विशेष समाजकल्याण अधिकारी केवळ निर्वाह अधिकारी म्हणून आहेत़ लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत अशा ३७ प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या. २३ प्रकरणांचा निकाल लागला आहे़ १४ अर्ज प्रलंबित आहेत़ मुलांच्या क्षमतेनुसार निर्वाह खर्च देण्याचे आदेश न्याय प्राधिकरणाने दिलेले आहेत, अशी माहिती स.समाज कल्याण आयुक्त दाणे यांनी दिली़