शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.

भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.हिंगोली तालुक्यातीज साटंबा येथे अफार्म पुणे व जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी पी.डी.शिंदे, डी.एस.डाखोरे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खते वापरून पिकवलेल्या धान्यातून माणसाच्या पोटात एक प्रकारचे विष जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची असलेल्या सेंद्रिय शेतीच्या उत्तम पर्यायाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच संजीवनी घ्यार, रामचंद्र घ्यार, मारोतराव घ्यार, राम घ्यार, अनिल तपासे यांची उपस्थिती होती. अशाच प्रकारे जामठी खु. गावातही बैठक घेण्यात आली. यावेळी प्रल्हादराव भवर, बंडू कऱ्हाळे, उत्तमराव कऱ्हाळे, भिकाजीराव भवर, उपसरपंच माधव भवर, कौतिकराव भवर, प्रकल्प अधिकारी दत्तराव भवर, संतोष भवर, संजय भवर, नामदेव घ्यार, भागवत घ्यार, समाधान टापरे, बालाजी घ्यार आदी उपस्थित होते. साटंबा येथील २५ तर जामठी खु. येथील ११ शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला असून त्याबाबतची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे कृषिदूत पी.डी.शिंदे देणार आहेत. हा कार्यक्रम निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. या भागातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीची कास धरत आहेत. (वार्ताहर)