शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

पर्ल्समध्ये लातूरकरांचे ३५० कोटी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूर चेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़

चेतन धनुरे/बाळासाहेब जाधव ल्ल उदगीर/लातूरचेन मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक उभी करणाऱ्या पर्ल्स या कंपनीकडून परतावा मिळणे थांबल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ लातूर जिल्ह्यातून साडेतीनशे कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाल्याचे पुढे आले आहे. सेबीच्या कारवाईनंतर आलेल्या वृत्तांमुळे जिल्हाभरातील गुंतवणूकदार हादरले आहेत. त्यांनी एजंटकडे पैशाचा तगादा लावल्याने एजंट चांगलेच हैराण झाले आहेत. गेल्या सोळा वर्षांपूर्वीपासून लातूर, औसा, चाकूर, रेणापूर, निलंगा उदगीर व देवणी भागात पर्ल्सची चेन मार्केटिंग सुरु झाली़ याच भागातील काही लोकांनी सुरुवातीला एजंटांचे जाळे विणत मोठमोठ्या परताव्याचा दावा करुन गुंतवणूकदारांचा ओढा पर्ल्सकडे वळविला़ वेगवेगळ्या आकर्षक योजनांद्वारे नागरिकांना या एजंटांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक करायला लावली़ बघता-बघता या भागातील एजंटांची संख्या संख्या हजारावर गेली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही वाढून कोट्यवधी रुपये कंपनीत गुंतविले गेले आहेत़ देवणी तालुक्यातील विजयनगर व दवणहिप्परगा येथील मुख्य एजंटांनी त्यांच्याखाली लहान एजंट तयार केले आहेत़ या एजंटांची संख्या हजारावर असल्याची माहिती मिळाली आहे़ विजयनगरचे बोरुळे व दवणहिप्परग्याचे राम टिळे हे या भागातील समुपदेशक आहेत़ त्यांनी चेन वाढवून एजंटांद्वारे कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली़ नजिकच्या काळापर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत गेला़ मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा परतावा मिळणे थांबले आहे़ गुंतवणूकदारांमध्ये राजकीय नेत्यांपासून शिक्षक, नोकरदार, कर्मचारी, मजूरदार, शेतकरी, महिला असा प्रत्येक घटक समाविष्ट आहे़लातूर जिल्ह्यात पर्ल्स एजंटांची संख्या मोठी आहे़ महिन्याला ५० हजाराचा भरणा करणाऱ्या एजंटांना चार टक्के कमिशन आहे. ५० हजार जमा करणाऱ्याच्या खिशात २ हजार रुपये जात होते़ त्यामुळे एजंट अधिकाधिक पैसे गोळा करण्यासाठी दिवसारात्र काम करायचे विशेष यामध्ये गुंतवणूक वाढत जाईल तसा एजंटाचाही दर्जा वाढत जायचा़ एजंटाचा फिल्ड आॅफिसर, त्यानंतर आॅर्गनायझर असे प्रमोशनही देण्यात येत असल्याने एजंटाच्या संखेत मोठी वाढ झाली़ परिणामी त्यांनी आपल्या नातेवाईकासह मित्रांनाही गुंतवणूक करण्यात भाग पाडले़ परंतु आजच्या परिस्थित त्या कंपनीची चौकशी होत एसआयटी मार्फत चौकशी होत असल्याने गुंतवणूकदाराबरोबरच एजंटही अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात या संस्थेचे २० हजारांहून अधिक एजंट आहेत. त्यात ग्रामीण भागातील महिलांचा मोठा समावेश आहे. सेबीच्या कारवाईच्या बातम्या येताच या साऱ्या एजंटांच्या मागे गुंतवणूकदारांनी तगादा लावला आहे. हा इतका भयानक आहे की अनेक एजंटांनी आपले भ्रमणध्वनी स्विच आॅफ केले आहेत. त्यामुळे गैरसमजात आणखी भर पडत असून गुंतवणूकदार त्यांच्या दारावर लोंढ्याने जात आहेत. शेजमजुरांनीही गुंतविले पैसे४गुंतवणुकीच्या आमिषाने चाकूर तालुक्यातील अलगरवाडी या चाकूर तालुक्यातील दोन अडीचशे कुटुंबाच्या गावात ९० टक्के पल्समध्ये पैसे गुंतविलेले लोक आहेत. या गावातील करुबाई केंगार ही मोजमजुरी करणारी महिला पैसे बुडणार की काय विचाराने अस्वस्थ आहे. अशीच अवस्था सखुबाई गेडमे या हातावर पोट असलेल्या महिलेची झाली आहे. कंपनीची सेबी व सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याने खाते गोठविण्यात आले आहेत़ त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येत नसल्याने तूर्तास परतावा थांबला आहे़ चौकशी समितीने परवानगी दिल्यास त्वरीत परतावा मिळणार आहे़ गुंतवणूकदारांच्या रकमेच्या सहापट मालमत्ता कंपनीकडे असल्याचा दावा करुन प्रत्येक गुंतवणूकदाराची रक्कम परत मिळेल, असे स्पष्टीकरण समुपदेशक राम टिळे, एजंट बालाजी वळसांगवीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले़ याबाबत आदर्श मैत्री फौंडेशनचे संतोष बिराजदार यांनी गुंतवणूकदारांचे संघटन करुन प्रत्येकाचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कोणतेही शुल्क न भरता गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन संघटीतपणे लढा दिल्यास गुंतविलेले पैसे आणण्यासाठी रचनात्मक लढाईसाठी एकत्रे यावे, असे आवाहनही संतोष बिराजदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.उदगीर तालुक्यातील कुमठा बु़ येथील रहिवासी असलेले श्रीरंग तलवारे हे रेल्वे खात्यात नोकरीस होते़ ते काही वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले आहेत़ त्यांना मिळालेल्या पेन्शनच्या रकमेपैकी २ लाख ५० हजार रुपये त्यांनी पर्ल्समध्ये गुंतविले़ मात्र आता परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना एजंटाकडे खेटे मारावे लागत आहेत़ वृद्धत्वातील आधारच अडकला असल्याची प्रतिक्रिया त्यांचे जावई राजकुमार कांबळे यांनी दिली़ एकुर्का येथील चालक ज्ञानोबा जाधव यांनीही १ लाख रुपये गुंतविले आहेत़