लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी हाती; एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीने सांगितलं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:45 IST2025-06-10T11:44:37+5:302025-06-10T11:45:23+5:30

दरोड्याचा दुसरा मास्टरमाइंड सुरेश गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख याच्या वाट्याचे २०० ग्रॅम साेने अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सूर्यकांत श्रीराम मुळेकडे ठेवले होते. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीची तब्बल ८ तास पोलिसांनी केली चौकशी, त्यानंतर लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी जप्त  

30 kg of silver seized from Ladda robbery after 8 hours of interrogation of Amol Khotkar's sister who was involved in an encounter | लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी हाती; एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीने सांगितलं ठिकाण

लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी हाती; एन्काउंटर झालेल्या खोतकरच्या बहिणीने सांगितलं ठिकाण

 

छत्रपती संभाजीनगर : उद्याेजक संतोष लड्डा यांचे लुटलेले ३० किलो चांदीचे भांडे, दागिने जप्त करण्यात पोलिसांना २४ दिवसांनी अखेर यश आले. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने त्याच्या कारच्या डिकीत ते ठेवले होते. १७ रोजी ती कार पडेगावच्या हिंदुस्तान गॅरेजसमोर उभी करून तो पसार झाला होता. अमोलची बहीण रोहिणी खोतकर (रा. पडेगाव) हिच्या मंगळवारच्या चाैकशीनंतर उलगडा होताच पोलिसांनी कारमधून ही चांदी जप्त केली. मात्र, साडेपाच किलो सोन्याचे गूढ उलगडलेले नाही.

आतापर्यंत १५ आरोपींना अटक झाली आहे. सहा आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्याची शक्यता आहे. अमोलची बहीण रोहिणी व मैत्रीण हाफिजा ऊर्फ खुशी अख्तर अली शेख हिच्या चौकशीची पोलिसांना प्रतीक्षा होती. खुशीची चौकशी बाकी असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिचा ताबा देऊ, असे सीआयडीने पोलिसांना कळवले आहे. तिच्या चौकशीतून सोन्याचे गूढ उकलण्याची अपेक्षा आहे.

रोहिणीचा ७ पानांचा जबाब
रविवारी पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. सोमवारी ती दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्तालयात हजर झाली. आठ तासांच्या चौकशीनंतर अमोलच्या कारमधील चांदीविषयी तिने कबुली दिली. १८ मे रोजी त्याने दोन बॅग फोक्सवॅगन कारमध्ये ठेवत ती गॅरेजसमोर उभी केली. ही बाब रोहिणीला माहीत होती. निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक प्रवीण पाथारकर, संदीप सोळुंके, संदीप शिंदे यांनी धाव घेत कार उघडल्यावर दोन बॅग भरून चांदी, काही रक्कम सापडली. त्यानंतर रोहिणीचा लेखी जबाब व जवळपास ५० मिनिटांचा व्हिडीओवर जबाब नोंदवण्यात आला.

आणखी एक गजाआड
दरोड्याचा दुसरा मास्टरमाइंड सुरेश गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख याच्या वाट्याचे २०० ग्रॅम साेने अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सूर्यकांत श्रीराम मुळेकडे ठेवले होते. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सूर्यकांतवर आतापर्यंत जवळपास १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांनी त्यास २०१२, तर बीड पोलिसांनी २०१६ मध्ये मोक्कात अटक केली होती. दरोड्यानंतर गंगणेला आपण पकडले जाणार नाही, असा अतिआत्मविश्वास होता. त्यातून त्याने १५ मे रोजी दरोडा टाकल्यानंतर १८ मे रोजी मारुती ब्रिझा कार विकत घेतली. पोलिस लवकरच ती कार जप्त करणार आहेत.

Web Title: 30 kg of silver seized from Ladda robbery after 8 hours of interrogation of Amol Khotkar's sister who was involved in an encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.