३ हजार जागा गायब

By Admin | Updated: December 19, 2014 00:59 IST2014-12-19T00:10:04+5:302014-12-19T00:59:28+5:30

औरंगाबाद : शहरात अंदाजे ३ हजार ठिकाणची पार्किंगची जागा व्यावसायिक उद्देशासाठी वापरली जात आहे़

3 thousand places are missing | ३ हजार जागा गायब

३ हजार जागा गायब

औरंगाबाद : शहरात अंदाजे ३ हजार ठिकाणची पार्किंगची जागा व्यावसायिक उद्देशासाठी वापरली जात आहे़ त्याची कुठलीही पाहणी पालिकेने केलेली नाही़ फक्त धोरणाच्या आड येणाऱ्यांची यादी काढणे आणि कारवाई करणे,असा सपाटा पालिका लावते. ३ हजार ठिकाणची पार्किंग गायब झालेली असताना पालिकेकडे १०० ठिकाणांची यादी आहे़
यातील ३५ ठिकाणची पार्किंगची जागा रिक्त करण्यासाठी मध्यंतरी मोहीम राबविली. पार्किंगची जागा गिळणाऱ्यांमध्ये मंगल कार्यालये, हॉस्पिटल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंटस्चा समावेश आहे़ पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि जाऊ तेथे खाऊ या वृत्तीमुळे पार्किंगच्या जागा विकून तेथे दुकाने सुरू झाली आहेत़ परिणामी डी़ पी़ रोडवर वाहने उभी राहतात़

 

Web Title: 3 thousand places are missing