शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २७ टक्के शवविच्छेदन अनावश्यक - इंद्रजीत खांडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:16 IST

राज्यात २७ टक्के शवविच्छेदन  अनावश्यक झाल्याचे समोर आले. त्यापोटी ९.५० कोटी रुपये खर्च झाल्याचे सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.

ठळक मुद्देडॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करून त्यासंदर्भात प्रमाणपत्र दिल्यावर शवविच्छेदनाची मुळीच आवश्यकता नसते; अनेकदा दिलेल्या कारणावर शंका व्यक्त होते आणि शवविच्छेदन केले जाते.अशा घटनांत शवविच्छेदनानंतर फार काही वेगळे कारण आढळून आलेले नाही. शवविच्छेदनाचा अधिकार पोलिसांचा

औरंगाबाद : डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करून त्यासंदर्भात प्रमाणपत्र दिल्यावर शवविच्छेदनाची मुळीच आवश्यकता नसते; परंतु अनेकदा दिलेल्या कारणावर शंका व्यक्त होते आणि शवविच्छेदन केले जाते. अशा घटनांत शवविच्छेदनानंतर फार काही वेगळे कारण आढळून आलेले नाही. राज्यात २७ टक्के शवविच्छेदन  अनावश्यक झाल्याचे समोर आले. त्यापोटी ९.५० कोटी रुपये खर्च झाल्याचे सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि.१९) ‘मेडिकोलीगल केसेस इन अ‍ॅनाटॉमी’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत डॉ. खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद््घाटन झाले. यावेळी परिषदेचे आयोजन अध्यक्ष विभागप्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. कैलास झिने, डॉ. गौतम श्रॉफ, डॉ. प्रतिमा कुलकर्णी-तुंगीकर, डॉ. अझर सिद्दीकी, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. परिषदेत न्यायवैद्यक प्रकरणाविषयी विविध मुद्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. खांडेकर म्हणाले की, डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. एकाच रुग्णावर अनेक डॉक्टर उपचार करतात. अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला, तर सर्वात शेवटी तपासणी केलेल्या डॉक्टरने मृत्यूचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. शवविच्छेदनासंबंधित कायद्यात व्यापक सुधारणेची गरज आहे. ११८ वर्षांपासूनच्या कायद्यानुसारच शवविच्छेदन होते. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. शिवाजी सुक्रे यांनी प्रास्ताविक  केले. 

शवविच्छेदनाचा अधिकार पोलिसांचाडॉक्टरांना शवविच्छेदन करून घेण्याचा अधिकार आहे, हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात एखाद्याचे शवविच्छेदन करावे की नाही, हा अधिकार पोलिसांचा आहे. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे. यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आता अनावश्यक शवविच्छेदनाचे प्रमाण कमी होत असल्याचे डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद