शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

२५८ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे.

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे. १००१ पैकी २५८ पाणी नमुने दूषित आढळल्याने सामान्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे? हे देखील समोर आले आहे. पातळी ३०० फुटाखाली गेल्याने अनेक भागांत क्षारयुक्त पाणी येत असून जलजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत महिन्याकाठी पाणीतपासणी होते. विहिरी, बोअरमधील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेचा फेबु्रवारी महिन्यातील अहवाल चिंताजनक आहे. आधीच टंचाईने प्रशासनाच्या नाकेनऊ आले आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेबु्रवारी महिन्यात विविध तालुक्यातील १००१ नमुने तपासणीकरता घेतले होते. त्यापैकी २५८ गावांतील नमुने दूषित असल्याचा निष्कर्ष आला आहे. दरम्यान, टंचाईचा काळ असल्याने जलस्त्रोतांची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच पाणीगुणवत्ता राखताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. दूषित पाणी आढळलेल्या ग्रामपंचायतींना शुद्धीकरणासंदर्भात सूचना केल्या आहेत. जलरक्षकांनाही कळविले आहे. उपाययोजना सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे होणारे आजार..!गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार असे विविध आजार दूषित पाणी पिल्याने होऊ शकतात. लहान मुले, वृद्धांसाठी दूषित पाणी सर्वाधिक घातक असते. (प्रतिनिधी)जलस्त्रोताच्या ५० फूट परिसरात मानवी व गुरांचे मलमूत्र नसावे. गटार नसावे, स्वच्छता हवी. नाल्यांचे पाणी मोकळे करुन द्यावे, स्त्रोतांबरोबरच टाक्यांमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी. वैयक्तिक पातळीवर तुरटी फिरवणे, दहा लिटर पाण्यात लिक्वीड क्लोरिनचे ५ थेंब टाकून पाणी शुद्ध करणे असे उपाय करता येतील. दूषित पाण्याने जलजन्य आजाराची शक्यता असते, त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच उपाय असल्याचे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी सांगितले.पूर्वी जिल्हास्तररावरुन ब्लिचींग पावडर खरेदी करुन ग्रामपंचायतींना पुरवठा केला जायचा. दोन वर्षांपासून गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतींना पावडर खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, काही ग्रामपंचायती जलशुद्धीकरणासाठी पावडर खरेदी करत नाहीत त्यामुळे दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.