शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:02 IST

शहरातील भारनियमनाचा रुग्णसेवेवर सर्वाधिक परिणाम होत आहे. नऊ तासांपर्यंत होणा-या भारनियमनाने नियोजित २५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालयांवर ओढावत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील भारनियमनाचा रुग्णसेवेवर सर्वाधिक परिणाम होत आहे. नऊ तासांपर्यंत होणा-या भारनियमनाने नियोजित २५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालयांवर ओढावत आहे. भारनियमनाच्या कालावधीत जनरेटरवर रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रियांना आधी प्राधान्य दिले जात असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले.शहरात छोट्या-मोठ्या खाजगी रुग्णालयांची संख्या चारशेवर आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारनियमनाने इतर सेवांप्रमाणे रुग्णसेवेतही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नऊ तासांपर्यंत भारनियमन होत आहे. परिणामी जनरेटर असूनही सेवा देण्यास रुग्णालय प्रशासनाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.शस्त्रक्रियागारातील बहुतांश वैद्यकीय उपकरणे ही विजेवर चालणारी असतात. त्यासाठी शस्त्रक्रिया करताना वीज असणे आवश्यक असते. जनरेटरद्वारे काही तासांसाठी वीजपुरवठा होतो. शिवाय काही उपकरणे जेनरेटरवर चालत नाहीत.भारनियमनाच्या काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुग्णाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही अशाच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे नियोजन केले जात आहे.आयसीयू, तसेच व्हेंटिलेटरची सेवा सुरळीत ठेवणे अवघड होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळच्या वेळेतील भारनियमनामुळे जनरेटर, इर्न्व्हटर नसलेल्या छोट्या रुग्णालयांतील बाह्यरुग्ण सेवा विस्कळीत होत आहे.