शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

२४ गावे जोखीमग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:33 IST

संजय तिपाले , बीड मागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये

संजय तिपाले , बीडमागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाबरोबरच योग्य त्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १७ जून रोजी नेकनूर (ता. बीड) येथे गॅस्ट्रोने पूजा महादेव जाधव या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे साथरोगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१२ पासून आतापर्यंत साथरोगामुळे तीन मृत्यू झाल्याची नोंद जि.प. च्या आरोग्य विभागाच्या दफ्तरी आहे; परंतु प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पावसाळ्यात साथरोग आपले हातपाय पसरवत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत साथरोगाचे रुग्ण आढळलेली गावे जोखीमग्रस्त जाहीर करुन तेथे उपाय केले जातात. जिल्ह्यात अशी २४ गावे आहेत. गेवराई तालुक्यातील सर्वाधिक ९ गावांचा यात समावेश आहे. नदीकाठची १४९ व यात्रा भरणारी ३९ गावे देखील साथरोगांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आरोग्य विभागामार्फत सुरु आहेत. त्यासाठी या सर्व गावांमधील जलस्त्रोतांमध्ये लिक्वीड क्लोरिन टाकले असून १५ मिटर परिसरात साफसफाई करुन घाण पाणी साचणार नाही अशी व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)माजलगाव : सुर्डी, भीमनगर, आष्टी : देवीनिमगाव, शेकापूर, पाटोदा : खोकरमोहा, निवडुंगा, केज : होळ, माळेवाडी, मस्साजोग, धारुर : तांदळवाडी, अंजनडोह, गेवराई : अर्धमसला, पाचेगाव तांडा, गौडगाव तांडा, चोपड्याचीवाडी, गोपतपिंपळगाव, मन्यारवाडी, गुळज, भोगलगाव, मादळमोही, बीड : घोसापुरी, येळंबघाट, अंबाजोगाई: अंजनपूर, माळेवाडी ही गावे जोखमीची जाहीर केली आहेत.