शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

२२ कोटींचा दंड रद्द

By admin | Updated: September 13, 2014 23:48 IST

बिलोली: फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या दौऱ्यादरम्यान वाळू घाटांवरील झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर दोन्ही घाटांना आकारण्यात आलेला २२ कोटी रुपयांचा दंड अखेर रद्द करण्यात आला आहे.

बिलोली: फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या दौऱ्यादरम्यान वाळू घाटांवरील झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर दोन्ही घाटांना आकारण्यात आलेला २२ कोटी रुपयांचा दंड अखेर रद्द करण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्दबातल केल्याचे पत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार बिलोली यांना पाठविण्यात आले आहे.आॅक्टोबर २०१३ मध्ये ‘मांजरा नदीपात्रातील सगरोळी व येसगी वाळू घाटांची ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. संबंधित वाळूघाटांचा ताबा डिसेंबरअखेर देण्यात आला. सगरोळी दोन तर येसगीचा वाळूघाट तीन कोटी बोलीला सुटला. ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत वाळू उपशाची मुदत देवून जवळपास ५० नियम व अटी लावण्यात आल्या. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वाळू उपशाला सुरुवात झाली. महिनाभर दोन्ही वाळू घाटांवरुन उपसा सुरु होत होता. अचानक जानेवारीअखेर परिसरात गारपीट झाली. प्रामुख्याने सगरोळी परिसरात ५ व ६ फेब्रुवारीला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. शेतकऱ्यांना बसलेला फटका पाहता जिल्हाधिकारी धीरजकुमार हे दौऱ्यावर पाहणी करण्यासाठी आले. खतगाव-सगरोळीदरम्यान परतीच्या प्रवासात असताना मार्गावर दोनशे ते तीनशे ट्रकच्या रांगा लागलेल्या होत्या. वाहतूक विस्कळीत झाल्याचा प्रकार पाहून जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली. तेव्हा वाळू भरण्यासाठी रांगा असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी रात्री आठ वाजता सगरोळी वाळूघाट गाठले. तेथील संपूर्ण स्थितीची पाहणी केली. दरम्यान, वाळूघाटांवरील गोंधळात त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाली. गंभीर परिस्थिती पाहता पोलिसांचा ताफा मागविण्यात आला. प्रकरणाची चौकशी सुरु झाली. ७ फेब्रुवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी बिलोलीच्या विश्रामगृहात मुक्काम ठोकला. यावेळी ४८ वाहनांसह ७५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला व घाट बंद केले. महिनाभर झालेल्या वाळूघाटांची अन्य तालुक्यांच्या पथकांकडून पाहणी केली.भोकर व नांदेड तालुक्यांतील पथकाने दोन्ही वाळूघाटांची लांबी, रुंदी, खोली मोजून जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. पथकाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २२ कोटी दंड आकारला व अनामत रक्कम, बँक गॅरंटीची रक्कम जप्त केली. वाळू घाटांवरील संबंधित ठेकेदारांनी थेट मंत्रालयात आव्हान दिले. एप्रिल २०१४ मध्ये दंड रक्कमेला स्थगिती देण्यात आली. परिणामी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईला ब्रेक बसला. आता अंतिम सुनावणी झाली असून संपूर्ण दंड रक्कम, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. ठेकेदारांना आता उर्वरित वाळू उपसा करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे. (वार्ताहर)