शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत १८ टक्के साठा

By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST

पैठण : धरणात धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे

पैठण : जायकवाडीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत पाऊस झाल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक ६०३३ क्युसेक्स क्षमतेने होत आहे. धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे.जायकवाडीचे मुक्त व बंदिस्त असे दोन पाणलोट क्षेत्र आहेत. नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्र हे बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येते. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग हा मुक्त पाणलोट क्षेत्रात येतो. या क्षेत्रात पाऊस झाल्यास पाणी जायकवाडीत विनाअडथळा दाखल होते. रविवारी मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या वैजापूर २० मि.मी., कन्नड ५५ मि.मी., श्रीरामपूर ८५ मि.मी., येवला ५२ मि.मी., कोपरगाव १८ मि.मी., लोणी २३ मि.मी., राहता ५० मि.मी., बोरवाहेगाव (ता. वैजापूर) ३८ मि.मी., देवगाव रुई ४५ मि.मी., शिर्डी ४५ मि.मी., असा समाधानकारक पाऊस झाला. या पावसाचे पाणी धरणात दाखल होत आहे. या शिवाय बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक ५ मि.मी., करंजवण २२ मि.मी., गंगापूर (नाशिक) १५ मि.मी., दारणा १७ मि.मी., भंडारदरा २१ मि.मी., ओझरखेड २० मि.मी., पालखेड ३७ मि.मी., ओझर वेअर २० मि.मी., नांदूर-मधमेश्वर २३ मि.मी. निळवंडे २८ मि.मी., असा गेल्या २४ तासांत पाऊस झाला. यामुळे तेथील दारणा धरणातून २१६३ क्युसेक्स व नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून ४४६९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे सर्व पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.आज सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५०१.८१ फूट झाली होती. धरणामध्ये एकूण जलसाठा ११२२.७९८ द.ल.घ.मी. एवढा झाला असून, या पैकी ३८४.६९२ द.ल.घ.मी एवढा उपयुक्त जलसाठा आहे. सोमवारपर्यंत धरणात १८ टक्क्यांपर्यंत जलसाठा होण्याची शक्यता शाखा अभियंता अशोक नरुटे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९९ टक्के, तर निळवंडे ९४ टक्के भरले आहे. शिवाय गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी. व निळवंडेमध्ये २८ मि.मी. पाऊस झाला. यंदा या धरणातून अद्यापही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. भविष्यात या भागात मोठा पाऊस झाल्यास एकदम मोठ्या क्षमतेने जायकवाडीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची होईल व त्यावेळी जायकवाडी व खालील भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. भंडारदरा, निळवंडेसह नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून येथे पाणी अडविण्यासाठी पॉकेट निर्माण करून ठेवल्यास पूर परिस्थिती योग्यरीत्या हाताळता येईल. त्यामुळे जायकवाडीसाठी वरील धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.