१८९७ विद्यार्थ्यांना ‘पास’ होण्याची संधी

By Admin | Updated: June 13, 2015 23:44 IST2015-06-13T23:44:06+5:302015-06-13T23:44:06+5:30

बीड : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,

18 9 7 students get the chance to become 'pass' | १८९७ विद्यार्थ्यांना ‘पास’ होण्याची संधी

१८९७ विद्यार्थ्यांना ‘पास’ होण्याची संधी


बीड : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे जिल्ह्यातील १८९७ विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ३८ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यासह (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) १२ हजार ७११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विभागात अव्वलस्थान पटकावणाऱ्या बीडमधील १ हजार ८९७ विद्यार्थी मात्र अयशस्वी झाले. फेरपरीक्षेमुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता येईल. (प्रतिनिधी)
पाचेगाव (ता. गेवराई) येथील तिरुपती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दाभाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, याआधी दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळत होता;परंतु फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना लगेचच गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करुन देणारा कालचा निर्णय आशादायी आहे.

Web Title: 18 9 7 students get the chance to become 'pass'