शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आखाड्यात उरले १५६ उमेदवार

By admin | Updated: October 2, 2014 01:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघांमध्ये मिळून निवडणूक रिंगणात १५६ उमेदवार उरले आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वांत कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे छाननीनंतर रिंगणात २८३ उमेदवार उरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यापैकी १२७ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सिल्लोड मतदारसंघात २५ पैकी ९ जणांनी माघार घेतली. तेथे आता १६ उमेदवार उरले आहेत. कन्नड मतदारसंघातही २० पैकी ८ जणांनी माघार घेतली. फुलंब्री मतदारसंघात २१ पैकी ८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक २६ जणांनी माघार घेतली. तरीही तेथे १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात २९ पैकी ११ जणांनी, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ५० पैकी २० जणांनी, पैठण मतदारसंघात ४१ पैकी २२ जणांनी, गंगापूर मतदारसंघात ३५ पैकी १८ जणांनी आणि वैजापूर मतदारसंघात १८ पैकी ५ जणांनी माघार घेतली.