शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जनधन’ साठी दीड लाख लाभार्थींचे खाते

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

जालना : पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार २७३ जणांचे खाते उघडण्यात आले असून गाव पातळीवर

जालना : पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार २७३ जणांचे खाते उघडण्यात आले असून गाव पातळीवर आर्थिक चळवळ अधिक गतीमान करणारी ही योजना असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आ. राजेश टोपे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलमखान, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर पुढे म्हणाले की, जनधन योजनेसाठी ज्यांनी अद्याप खाते उघडले नाहीत, त्यांनी ते तातडीने उघडावेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने जिल्ह्याला १२३ कोटी रुपयांचा प्रथम हप्ता दिला आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी नायक, जि.प.चे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देवजी भगवान काकडे यांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)