शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गटार योजनेसाठी केंद्र शासनाने दिला १४४ कोटींचा निधी

By admin | Updated: August 20, 2014 00:56 IST

औरंगाबाद : शहरातील ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी २०४५ सालापर्यंतच्या नियोजनासाठी ३६६ कोटी रुपयांची ‘सिव्हेज डेव्हलपमेंट अपग्रेडेशन’ योजना नगरोत्थान अंतर्गत मनपाने तयार केली आहे़

औरंगाबाद : शहरातील ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी २०४५ सालापर्यंतच्या नियोजनासाठी ३६६ कोटी रुपयांची ‘सिव्हेज डेव्हलपमेंट अपग्रेडेशन’ योजना नगरोत्थान अंतर्गत मनपाने तयार केली आहे़ ४६४ कोटीतून त्या योजनेचे काम होणार असून, योजनेचा कालावधी तीन वर्षांचा आहे. शासन ८० टक्के अनुदान देणार आहे़ राज्यशासन व पालिकेला १० टक्के रक्कम उभारावी लागणार आहे़ फोरट्रेस ही संस्था ड्रेनेज सिस्टीमवर काम करीत आहे. १४४ कोटी रुपयांचा निधी संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाने जानेवारी २०१४ मध्ये मनपाला दिला आहे. १५२ कोटींचे एसटीपी१९७५ पासून आजवरच्या एसटीपींपैकी फक्त सिडकोचा प्लांट सुरू आहे़ सलीम अली सरोवरामधील प्लांट सुरू असून झाल्टा, बनेवाडी येथील प्लांट बंद आहेत़ त्या दोन्ही एसटीपीसहयोजनेमध्ये १५२ कोटी ८७ लाख रुपयांचे ७ एसटीपी प्रस्तावित आहेत़ त्यापैकी ६ एसटीपी होतील. १८४ एमएलडी पाणी ६ प्लांटमधून शुद्ध करण्याचा दावा पालिका करीत आहे. ७ नाल्यांपैकी ४ नाले कांचनवाडीच्या दिशेने जातात़ तेथे मोठा एसटीपी असेल़ तेथील १०० एमएलडी पाणी एमआयडीसीला ५ रुपये किलो लिटरने विकण्याचा दावा आहे.मनपाच्या ५० एकरपैकी १० एकर जागेवर तो प्लांट असेल़ उद्यानाजवळील प्लांटचे पाणी बसस्थानक व उद्यानाला देण्याचा मनपाचा विचार आहे़ मजनू हिल एसटीपीतील शुद्ध केलेले पाणी सलीम अली सरोवरामध्ये सोडण्यात येईल़२०९ कोटींच्या ड्रेनेज वाहिन्या़़़ २०९ कोटी ७५ लाख रुपयांतून लॅटलर्स, ब्रँचेस, मेन सिव्हर, १५० डायमीटरच्या ३४० कि़ मी़ ड्रेनेज वाहिन्यांची योजनेत तरतूद आहे़ २७१ कि़ मी़ नवीन वाहिन्या टाकण्यात येणार आहेत़ जुन्या लाईन तशाच ठेवण्यात येतील़ विद्यमान मेन सिव्हर लाईन्स ७१ कि़ मी़ असून, त्या पूर्णत: फुटल्या आहेत़ त्यामुळे नाल्यातून मलमिश्रित पाणी वाहते़ खाम व सुखना नदीपात्रातून २४० एमएलडी पाणी गोदावरीच्या दिशेने जाईल़ तेथून ६० एमएलडी पाणी वाहणार आहे़ २०४५ पर्यंत शहराची संकल्पित लोकसंख्या ३०० एमएलडी मलमिश्रित जलउत्सर्जित करेल़ ते पाणी एसटीपीमध्ये शुद्ध करण्यात येईल, असा मनपाचा दावा आहे.