शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

मराठवाड्यातील चारा छावण्यांसाठी १४२ कोटींचा होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:15 PM

१,१४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या. जनावरांच्या तुलनेत फक्त ९ टक्के जनावरे छावण्यांमध्ये आहेत. 

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या. १ ते ३१ मेपर्यंत चारा छावण्यांवर १४२ कोटींचा खर्च होणे अपेक्षित धरून अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. १,१४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. सर्व छावण्यांमध्ये ४ लाख ८५ हजार ११९ मोठी जनावरे तर ४४ हजार ९५२ लहान जनावरे आहेत.जनावरांच्या तुलनेत फक्त ९ टक्के जनावरे छावण्यांमध्ये आहेत. 

तसेच जूनअखेरपर्यंत १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा विभागीय प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर केला असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांत आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनअखेरपर्यंत विभागातील संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजनांसाठी १५७ कोटींच्या आसपास रक्कम लागेल असे गृहीत धरले होते. विंधन विहिरी, कू पनलिका, प्रादेशिक नळ योजनांची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती मोहीम, पूरक नळयोजना, टँकर पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, गाळ काढणे, बुडक्या घेण्यासारख्या योजनांचा कृती आराखड्यात समावेश होता.

गाळ काढण्यासाठी १ कोटी १० लाख, विहिरींच्या अधिग्रहणासाठी ४८ कोटींच्या आसपास खर्च प्रशासनाने गृहीत धरला होता. तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर अंदाजे दीड कोटी रुपये इतकी रक्कम लागेल. विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी २२ लाख तर प्रादेशिक  नळ योजनांची विशेष दुरुस्तीसाठी  २ कोटींचा खर्च प्रशासनाने गृहीत धरला आहे. विंधन विहिरी आणि कूपनलिकांसाठी सव्वादोन कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे. 

टँकर खर्चाची उड्डाणे कोटींच्या घरात जूनअखेरपर्यंत टँकरच्या पाणीपुरवठ्यावर सुमारे ११० कोटींच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत ९४ कोटींच्या आसपास खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला आहे. यामध्ये योजनांसह गाव आणि वाड्यांचा खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यातील सर्व ८७२ प्रकल्पांत १.७२ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. ३ हजार ३८६ टँकरने ५५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.  टँकर अद्याप कमी झालेले नाही. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादfundsनिधीMarathwadaमराठवाडा