१३७ महिला, १११ बालकांची तपासणी
By Admin | Updated: May 23, 2014 00:21 IST2014-05-22T23:58:17+5:302014-05-23T00:21:23+5:30
लोहारा : महिला व बालकल्याण विभाग आणि स्पर्श ग्रामीण रूग्णालय यांच्या विद्यमाने आयोजित मेळाव्यात १३७ महिला आणि १११ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

१३७ महिला, १११ बालकांची तपासणी
लोहारा : जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभाग आणि सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात १३७ महिला आणि १११ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मिशन आयएसओ ९००१-२००८ याअंतर्गत हा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, ‘स्पर्श’चे प्रकल्प अधिकारी आर. बी. जोशी, तहसीलदार चव्हाण, पं. स. सभापती असिफ मुल्ला, गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे, लोहार्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बी. आर. ढवळशंख आदींची प्रमुख उपस्थिती होती. महिला व बालकांचा गावनिहाय आराखडा करून एकखिङकी योजनेअंतर्गत त्यांना सर्व सेवा-सुविधा तात्काळ मिळवून देण्याचा या मिशनचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. या रूग्णालयात आठवड्यातील प्रत्येक मंगळवार हा दिवस मातृत्व संवर्धन दिन म्हणून राबविला जातो. यात गरोदर मातांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, सोनोग्राफी एकत्रपणे केली जात असून, या उपक्रमाचा आतापर्यंत साडेसातशे गरोदर मातांनी लाभ घेतल्याचे प्रकल्पाधिकारी जोशी यावेळी म्हणाले. उमरगा येथील डॉ. सारिका बेडदुर्गे, डॉ. रामेश्वरी घोडके, डॉ. सुहास मुसांडे, डॉ.आम्लेश्वर गारठे यांनी महिला व बालकांची तपासणी केली. सूत्रसंचालन जगदीश कुलकर्णी यांनी केले तर ढवळशंख यांनी आभार मानले. (वार्ताहर)