शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

११६ संचालकांची बँकखाती गोठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:44 IST

जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी भरली नसल्याने या सोसायट्यांच्या ११६ संचालकांचे बचत खाते जिल्हा बँकेने गोठविले असून, २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्या संदर्भातील प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी भरली नसल्याने या सोसायट्यांच्या ११६ संचालकांचे बचत खाते जिल्हा बँकेने गोठविले असून, २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्या संदर्भातील प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे़परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नुकतीच आढावा बैठक पार पडली़ या बैठकीत बँकेच्या कर्जाच्या वसुलीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली़ त्यामध्ये अनेक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात बँकेची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले़ ३० जून २०१७ अखेर १४६ अवसायनातील संस्थांकडे ५५५०़१८ लाख रुपयांची थकबाकी आहे़ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडे असलेल्या थकबाकीचाही यावेळी आढावा घेण्यात आला़ यामध्ये न्यायालयाचे अवार्ड प्राप्त व थकबाकीतील संस्थेच्या ७८२ संचालकांपैकी ३५५ संचालकांच्या मालमत्तेचा शोध घेऊन त्यापैकी २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बँक कर्जाचा बोजा नोंद घेण्या संदर्भातील पत्र बँकेच्या विशेष वसुली अधिकाºयांना देण्यात आले होते़ त्या अनुषंगाने ३७ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करून या संदर्भातील मालमत्तेची कागदपत्रे विशेष वसुली अधिकाºयांनी महसूल विभागाकडून हस्तगत केली आहेत़ याशिवाय ११६ संचालकांचे अवार्डच्या अनुषंगाने बँकेतील बचत खाते गोठविण्यात आले आहे. जोपर्यंत हे संचालक बँकेकडे थकबाकी भरणार नाहीत, तोपर्यंत या खात्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही़