उमरगा : केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत येथील शेंडगे रूग्णालयात विविध प्रकारच्या १०५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना लाभ मिळत आहे़ विविध ९७२ अजारावर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत़ एका कुटुंबास प्रतिवर्षी दीड लाख रूपयांप्रमाणे उपचार, शस्त्रक्रियेसाठी मिळणार आहेत़ तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ रूग्णांना वैद्यकीय सुविधा, निदान सेवा, भूलसेवा, औषधोपचार, सुश्रूषा आदी विविध लाभ देण्यात येत आहेत़ माहितीसह इतर बाबींसाठी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे़ डॉ़आऱडी़शेंडगे यांच्या रूग्णालयात मूतखडा, पोटाचे आजार, अस्थमा, किडनी, ब्रेन ट्यूमर, जंतू संसर्ग आदी विविध १०५ अजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ़ शेंडगे, डॉक़ुमुदीनी शेंडगे, डॉ़विजय बेडदुर्गे, डॉ़सारिका बेडदुर्गे यांनी केले आहे़ (वार्ताहर)
‘जीवनदायी’तून १०५ शस्त्रक्रिया
By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST
उमरगा : केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत येथील शेंडगे रूग्णालयात विविध प्रकारच्या १०५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़
‘जीवनदायी’तून १०५ शस्त्रक्रिया
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}