शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या फेरीनंतरही १००३ जागा रिक्त

By admin | Updated: July 13, 2017 00:27 IST

नांदेड: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८७ शाळेत पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा अद्यापही रिक्तच आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८७ शाळेत १ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा अद्यापही रिक्तच आहेत़ बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ यासाठी पहिली फेरी ७ मार्च रोजी पार पडली़ एकूण २ हजार ६०१ जागेसाठी १ हजार ९६९ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली़ त्यापैकी १ हजार १४७ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतला तर ३९४ विद्यार्थ्यांना विविध कारणांहून अपात्र ठरविण्यात आले़ तर ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्कच केला नाही़ दुसरी निवड यादी २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आली़ एकूण १ हजार ४५४ जागांपैकी २३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ तर ३८ विद्यार्थी प्रवेशासाठी अपात्र ठरले़ तिसरी फेरी १९ एप्रिल रोजी पार पडली़ १ हजार २२२ जागांपैकी १३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़ चौथी फेरी ८ मे रोजी जाहीर झाली़ यामध्ये १ हजार ८४ पैकी ९२ विद्यार्थ्यांची निवड केली़ तर ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ आता पाचवी फेरी अखेर १ हजार ३ जागा रिक्त आहेत़ दरम्यान, आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, तर काही शाळेत पालकांनीच पाल्यांना प्रवेश दिला नाही़ दरम्यान, रिक्त जागेसाठी व आरटीई २५ टक्के अ‍ॅडमिशनपासून वंचित असलेल्या शाळांनी रजिस्ट्रेशन करणे व आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यासाठी दुसरी प्रवेश फेरी सुरू करण्यात येत आहे़ ज्या शाळा प्रथम फेरीत रजिस्ट्रेशन केले नाहीत, अशा सर्व पात्र शाळा व प्रथम फेरीमधील ज्या शाळांना जागा वाढविण्यासाठी नोंदणी करायची आहे, अशा शाळांना १० त १४ जुलै या कालावधीत संधी देण्यात आली आहे़