शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी १०० जणांचे उपोषण

By admin | Updated: June 24, 2014 00:42 IST

जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी, विद्यार्थी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १०० कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या

जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी, विद्यार्थी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १०० कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़ येथील तहसील कार्यालयासमोर २३ जूनपासून हे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे़ जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातील गारपीट व अतिवृष्टी झालेल्या शेतीचे पंचनामे अनेक ठिकाणी झाले नाहीत़ अनेकांना मदतीपासून डावलण्यात आले़ प्रलंबित अनुदान बँकेमार्फत धिम्या गतीने वाटप होत आहे़, सन २०१४-१५ खरीप व रबी हंगामाकरीता नवीन कर्जपुरवठा तत्काळ करण्यात यावा शिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे दत्तक असलेल्या गावांना कर्जपुरवठा करण्यास बँक टाळाटाळ करीत आहे़ यामुळे काही गावे स्टेट बँक आॅफ इंडिया व स्टेट बँक आॅफ हैदराबाद यांना जोडावीत, शेतकरी बांधवांना बैलजोडी, ठिबक सिंचन, शेतीपूरक व्यवसाय, पाईपलाईन, विहीर खोदकाम, गोदाम बांधकामाकरीता बँकेकडून कर्जपुरवठा तत्काळ व्हावा, राजीव गांधी घरकूल योजना व शैक्षणिक कर्ज बँकांकडून तत्काळ वाटप करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मंजूषा लटपटे यांना देण्यात आले़ निवेदनावर राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, तालुकाध्यक्ष शरद अंभोरे, विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत, नानासाहेब राऊत, शौकतलाला, विश्वनाथ राठोड, गजानन कांगणे, गजानन चव्हाण, वाकळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़ (वार्ताहर)आंदोलन तीव्र करणारशेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास २४ जून रोजी रास्ता रोको, २५ रोजी मोर्चा व त्यानंतर जिंतूर शहर बंद करण्यात येईल, याउपरही प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांनी दिला़