शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीपात्रातून १० वाहने, जेसीबी मशीन जप्त

By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST

क्यातील धानोरामोत्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहन व साहित्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी १७ एप्रिल रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास धाड टाकली.

पूर्णा : तालुक्यातील धानोरामोत्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहन व साहित्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी १७ एप्रिल रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. यामध्ये १० मोठी वाहने, जेसीबी मशीन व वाळू उपसा करणारे यंत्र महिवाल यांनी ताब्यात घेतले आहेत़ धानोरामोत्या शिवारात गोदावरी नदीपात्रात एका गटातील वाळू धक्का चालविण्यासाठी दिला असता, त्या वाळू धक्क्यातील वाळू उपसा न करता दुसऱ्याच गटातील वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्याकडे आली होती़ जेसीबीच्या सहाय्याने हा उपसा होत असल्याचे तक्रारीतून समजल्याने तक्रारीची दखल घेत रविवारी पहाटे ५़३० च्या सुमारास जिल्हाधिकारी महिवाल यांनी या भागाला भेट दिली़ या ठिकाणी पाहणी करून अवैधरित्या दुसऱ्या गटातील वाळू उपसा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़ जिल्हाधिकारी महिवाल घटनास्थळी अचानक दाखल झाल्याने वाळू उपसा करणारे कामगार व वाहनचालकांनी आपली वाहने जागेवर सोडून पळ काढला़ सकाळी ७ वाजता पूर्णेचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड, चुडावा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेजवळ यांच्यासह मंडळ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ घटनास्थळाचा पंचनामा करून पथकाने लहान, मोठी वाहने, जेसीबी मशीन व वाळू उपसा करणारे यंत्र ताब्यात घेतले आहेत़ या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, जिल्हाधिकारी महिवाल हे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील वाळू माफियांवर रात्री-अपरात्री फिरून कारवाई करीत आहेत़ या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)