शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार कोटी ‘गुंतवणूक लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:56 IST

मराठवाड्यात १० हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात १० हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे. टाटा, सिमेन्स, स्टरलाइट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आॅरिक सिटीतील कामांची पाहणी करून आढावा घेतल्यामुळे भविष्यात तेथे गुंतवणूक होण्याची शक्यता ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन मराठवाडा’ या दुसºया औद्योगिक परिषदेमुळे निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला.या परिषदेत कॅनडा, फ्रान्स व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सीआयआय, चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे एमजीएमच्या रु ख्मिणी सभागृहात शुक्रवारी परिषद घेण्यात आली.यावेळी कॅनडाचे व्यापार आयुक्त जोनाथन कुपी, सीआयआयचे राज्याध्यक्ष ऋषी बागला, मराठवाडा अध्यक्ष एऩ श्रीराम, रसना समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पिरूझ खंबाटा, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, के. श्रीनिवासन, अविक रॉय, देसाई, राजेंद्र देवतळे, डीएमआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार, भास्कर मंडल, सुनील खन्ना, राजीव विजय, निनाद करपे आदींची उपस्थिती होती.परिषदेसाठी आलेल्या उद्योजकांनी गुरुवारी सायंकाळी आॅरिक सिटीतील सुविधांची पाहणी केली. आॅरिक काही उद्योजकांच्या मनात भरले आहे. नवीन गुंतवणूक व विस्तारीकरणासाठी आॅरिक मध्ये भविष्य आहे. असे सीआयआयचे अध्यक्ष बागला यांनी सांगितले. गेल्यावर्षी घेतलेल्या पहिल्या परिषदेतून १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य होते. २,५०० कोटींची गुंतवणूक झाली. ५२ ऐवजी ८ हजार रोजगारनिर्मिती झाली. २८ हजार अप्रत्यक्ष रोजगाराचे लक्ष्य होते. असेही यावेळी सांगण्यात आले. परिषदेच्या दिवसभराच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मुंबई, पुणे, नाशिकपेक्षा मराठवाडा उद्योगांसाठी मोठा पर्याय आहे. दळणवळणाच्या भविष्यात होणाºया सुविधांबाबत सर्वंकष चर्चा परिषदेत झाली.