शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे १ लाखांचे सागवान रेल्वेतून जप्त

By admin | Updated: May 24, 2014 00:43 IST

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़ अंधाराचा फायदा घेत लाकूड चोरटे तर पळालेच, पण काही नगही घेवून ते पसार झाले़ हा प्रकार किनवट रेल्वेस्टेशनवर घडला़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे रेल्वेस्टेशन आंध्रा सीमावर्ती आहे़ या मार्गावरून अनेक रेल्वे ये-जा करतात़ प्रवाशांसाठी असणार्‍या रेल्वे गाड्यांचा सर्रास वापर लाकूड चोरट्यांनी लाकूड तस्करीसाठी, दारू तस्करीसाठी चालविला आहे़ प्रवाशांना त्रास देत या तस्करी बिनभोबाटपणे सुरू असतानाही रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिस मूग गिळून गप्पच आहेत़ २३ मे रोजी आदिलाबाद ते परळी-पूर्णा या पॅसेंजर गाडीने सागवान लाकडे सीमावर्ती अंबाडी जंगलातून किनवट येथे येत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली़ त्यावरून किनवटचे वनक्षेत्रपाल बी़पी़ आडे, वनपाल एस़बी़ कोळी, डी़आऱ वळदकर, आऱबी़ पोतदार, ए़बी़ राठोड, भारत गोफणे, खामकर, गुरूसिंगे, घोडके, वनमजूर भरगे, पवार, शे़रफीक पुय्यड, शे़अप्सर यांनी किनवट पोलिस स्थानकावर रेल्वे डब्यातून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार पाट काढलेले १९ नग जप्त केले़ यापूर्वीही धनबाद एक्स्प्रेसमधून व पॅसेंजर गाडीतून सागवान लाकडे वनविभागाने जप्त केली होती़ संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी याकडे कानाडोळ तर करतातच, पण अर्थपूर्ण व्यवहार करूनच गाडीत लाकडे टाकली जात असल्याचे सांगण्यात येते़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट व अंबाडी हे दोन रेल्वेस्टेशन अवैध दारू, गुटखा व लाकूड तस्करीसाठी अलीकडे चर्चेत आले आहे़ आदिलाबादहून येणार्‍या गाडीत सागवान लाकडे व गुटखा येतो तर जाणार्‍या गाडीत प्रचंड दारूचे बॉक्स जात असतानाही याला आळा घालण्यास कोणी पुढे येत नसल्याने याचा त्रास प्रवाशांना होत आहे़ परवाच अंबाडी येथून जाणारे दारूचे बॉक्स रेल्वेस्टेशन मास्तर व कर्मचार्‍यांनी रोखले़ मात्र दारू तस्करांनी हुज्जत तर घालीच, पण झटापट करून आपली व आल्या मालाची सुटका करून घेतली़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्धही केले होते़ पण लाकूडचोरटे, दारू तस्कर व गुटखा तस्कर यांचे व रेल्वेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे देवाण-घेवाणीचे संबंध असल्यानेच सध्या रेल्वे प्रवाशांबरोबरच लाकूड, दारू, गुटखा तस्करीसाठी वापरली जात आहे़ रेल्वेने होणारी सागवानाची तस्करी पाहता नांदेडचे उपवनसंरक्षक यांनी रेल्वेच्या नांदेड येथील अधिकार्‍यांच्या ही बाब पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिली़ पण काहीच उपयोग झाला नसावा, असेच दिसून येते़ वेळीच लाकूड चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्यास अंबाडी व रेल्वे पटरीला लागून असलेले किनवट तालुक्यातील जंगल नष्ट होण्याची भीती वृक्षपे्रमी करीत आहेत़ (वार्ताहर)