शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

खत-बियाणांच्या वंचनेला जिल्हा परिषद अध्यक्षच जबाबदार

By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST

जिल्ह्यातील शेतकरी ऐन हंगामात सेंद्रीय खत आणि बियाणांपासून वंचित आहेत.

आयुक्तांकडे तक्रार : वारजुकर व अहिरकर यांचा आरोपचंद्रपूर: जिल्ह्यातील शेतकरी ऐन हंगामात सेंद्रीय खत आणि बियाणांपासून वंचित आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले याच जबाबदार आहेत. त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच हा दुर्देवी प्रकार घडला आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य सतिश वारजुकर आणि विनोद अहिरकर यांनी केला आहे.दरवर्षी मार्च महिन्यात सभा घेवून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येते. यावर्षी सन २०१४-१५ चे सुधारित बजेट आणि २०१५-१६ चे मुळ बजेट करण्याकरिता जिल्हा परिषदेची सर्वसाधारणची विशेष सभा २६ मार्चला घेण्यात आली. या सभेत वित्त सभापती ईश्वर मेश्राम यांच्याकडे कोणत्याही सदस्याने मुळ बजेटमध्ये योजना कमी करणे किंवा बंद करणे याबाबत सूचना केली नव्हती. उलट काही योजना नव्याने समाविष्ठ करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यासाठी अध्यक्षांना सुधारणा करण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र केवळ राजकीय हेतूने अध्यक्षांनी साडेतीन महिन्यानंतरही बजेट मंजूर केले नसल्याचा आरोप या दोन्ही सदस्यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्य लेखा वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी वित्त विभागाकडे बजेट उपलब्ध करुन देण्याकरिता डेप्टी सीईओ (सामान्य) विपुल जाधव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. जाधव यांनी अध्यक्षांना या संदर्भात जाणीवही करुन दिली होती. परंतु त्यांनी वित्त अधिकाऱ्यांंचीच बदली केली. यामुळे त्यांना तक्रार करणे महागात पडल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.या नंतर २ जूनला झालेल्या वित्त समितीच्या सभेत ठराव क्र. १ (ब) नुसार सन २०१५-१६ च्या मुळ अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेची मंजुरी अप्राप्त असल्याने ही बाब आयुक्तांना निदर्शनास आणून द्यावी, असे ठरविण्यात आले. त्यानुसार मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांनी ९ ही बाब आयुक्तांना निदर्शनास आणून दिली. तरीही अध्यक्षांनी अद्याप कसलीही हालचाल केलेली नाही. जिल्ह्यात खरीपाचा हंगाम सुरु आहे. गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे, सेंद्रीय खताची योजना जिल्हा परिषदेने कृषी विभागामार्फत राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. मात्र मंजुरीच नसल्याने हा निधी पडून आहे. परिणामत: ऐन हंगामात शेतकरीही वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची देयके वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामे अडली आहेत. कर्मचारीही हतबल असल्याचे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)