शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि यासारख्या अनेक रानभाज्या पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी रानभाज्या महोत्सव : उद्योगाला चालना देणाऱ्या रानभाज्या

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भद्रावती शाखा यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह भद्रावती येथे आयोजित रानभाज्या महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती प्रविण ठेंगणे, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, मंडळ कृषी अधिकारी चंदनखेडे, यु. बी. झाडे, किशोर उपरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर दिवसे, शेतकरी मित्र अजय पिंपळकर, माधव जीवतोडे यांची उपस्थिती होती.तालुक्यातुन विविध रानभाज्याचे ३१ स्टॉल लावण्यात आले होते. या प्रसंगी मान्यवरांनी तथा उपस्थित शेतकऱ्यांनी राजभाज्यांचे महत्त्व पटवून दिले. या सर्व रानभाज्या शून्य खर्चातले नैसर्गिक पीक असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रथिने, जीवनसत्वामुळे आजार व विकासावर मात करण्यास मदत होते. तसेच हे उत्पादन फार कमी अवधीत होत असून या रानभाज्यांची जनजागृती झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरू शकते, असे स्टॉलधारक शेतकऱ्यांनी सांगितले.रानभाज्या महोत्सवात काळा तांदूळ, कोहळा, बांबु, कडु तोंडले, आंबुसी, वाघाटी, पुडाच्या शेंगा, पातूर, अंबाडी, भुई आवळी, केना, फोमटी, तरोटा आदी भाज्या होत्या.राजुऱ्यातही महोत्सवराजुरा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी व रानफळे महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजुरा बाजार समितीचे सभापती सी. कवडू पोटे, तसेच जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती राहुल उरकुडे, उपसभापती मंगेश गुरनुले, नलगे, जि. प. सदस्य कुंदा जेणेकर, वाघोजी गेडाम, आदिवासी राज्य पुरस्कार प्राप्त सेवक राजभाऊ ढोमणे, गोविंदा मोरे,विठ्ठल मकपल्ले, चेतन चव्हाण, ढवस, संदीप दातारकर, किशोर चंदनवटे आदीची उपस्थिती होती. या महोत्सवात सुरूंग, काटेमार, नळी, कुवाडी, तांदुळका, कुरडू, खापर खुटे, फोफुंडा, पातूर, कोंबई, मलबेरी, ग्रिन टी इत्यादी रानभाज्या तालुक्यातील मांगली, पेवरा, मुधोली कोंढा, आष्टी (वडेगाव), मांगली व इतर गावामधून शेतकºयांनी आणल्या होत्या.रिमझीम पावसात रानभाज्यांचा नजरानावढोली : रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि यासारख्या अनेक रानभाज्या पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.चंद्रपूर जिल्हा वनवैभवाने संपन्न आहे. येथील जंगलात मोठया प्रमाणावर दुर्मीळ वन्यजीव आढळतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनाला उपयोगी रानभाज्यांचा खजिना येथे आहे. मानवी आरोग्यास अतिशय लाभदायी ठरणाऱ्या विविध रानभाज्या जंगलालगत असणारे नागरिक चवीने खातात .पण आता रानभाज्या, रानफुले उपलब्ध असूनदेखील अनेकांना माहित नाही. त्यामुळ हा महत्त्वपूर्ण रानठेवा दुर्लक्षित आहे. या सर्व रानठेव्याची माहिती व्हावी, या हेतून रविवारी गोंडपिपरी तालुका कृषी कार्यालयात रानभाजी महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवात जंगली भागात वास्तव्य करणाऱ्या अनेक शेतकरी बांधवांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणल्या. अनेकांनी या भाज्या पहिल्यादांच बघितल्या. उत्सुकतेपोटी भाज्यांची माहिती जाणून घेतली. अनेक महिलांनी या महोत्सवात सहभाग घेतला. महोत्सवाचे प्रमुख आयोजक तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, तहसीलदार सीमा गजभीये, मुख्याधिकारी माधुरी सलामे, नगराध्यक्ष सपना साखलवार, जि.पं.सदस्य वैष्णवी बोडलावार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलvegetableभाज्या