विकलांगतेवर मात करून तुम्ही आपले ध्येय गाठू शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST2020-12-06T04:29:27+5:302020-12-06T04:29:27+5:30

सिक्की यादव : बल्लारपूर येथील अंध मुलींचे वस्तीगृहात कार्यक्रम विसापूर : विकलांगतेवर मात करून स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञांनी मोठ ...

You can achieve your goals by overcoming disability | विकलांगतेवर मात करून तुम्ही आपले ध्येय गाठू शकता

विकलांगतेवर मात करून तुम्ही आपले ध्येय गाठू शकता

सिक्की यादव : बल्लारपूर येथील अंध मुलींचे वस्तीगृहात कार्यक्रम

विसापूर : विकलांगतेवर मात करून स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञांनी मोठ मोठे शोध लावून स्वत:ला सिद्ध केले. तुम्हीपण विकलांगतेवर मात करून आपले ध्येय गाठू शकता. असे मत नगरसेवक सिक्की यादव यांनी व्यक्त केले.

जागतिकअपंग दिनाचे औचित्य साधुन दृष्टिहीन जनकल्याण बहुद्देशीय संस्था बल्लारपूर व विकलांग एकता शक्ति संगठन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अंध मुलींचे वस्तीगृह बल्लारपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युसूफ शेख, दृष्टिहीन जन कल्याण संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम, विकलांग एकता शक्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक वाकडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रदीप लांडगे तर संचालन सतीश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला संध्या चौबे, सिद्धार्थ टिपले, प्रवीण घोगले, शालिनीताई रामटेके, इंद्रजीत भारद्वाज , राजू सुरमवर गणेश पुरेकर निर्दोष वाडके, रंजना दुपारे, सरला गेडाम, अनिल बांगड़े, गोपाल शेंडे, आदी उपस्थित होते.

Web Title: You can achieve your goals by overcoming disability