शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

मिरची सातऱ्याने मिळाले महिला मजुरांच्या हाताला काम

By admin | Updated: February 2, 2015 23:03 IST

विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो.

कान्पा: विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो. परंतु, कानपा येथे मिरची कटाईच्या सातऱ्यामुळे परिसरातील शेकडो महिलांना काम मिळाले आहे. कानपा हे गाव नागपूर-चंद्रपूर मार्गावर असून येथे कोणतेही उद्योग नाही. येथे मिरचीचे तीन सातरे सुरू झाले असून डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या तीन मिरची सातऱ्याने कानपा, बिकली व आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष वर्ग येथे कामासाठी येत आहेत. दररोज तिन्ही मिरचीच्या सातऱ्यात मिळून २०० ते २५० मजूर या कामात आहेत. मिरचीच्या देठ काढून त्याला चांगले बनविणे असे येथे काम असते. या सातऱ्यावर वेगवेगळ्या जातीच्या मिरची आणल्या जातात. प्रत्येक महिला मजुरांना बोऱ्याप्रमाणे भाव मिळत असून एक महिला दिवसाला १०० ते १५० रुपये कमावित आहे. यापूर्वी या परिसरातील महिला भुयार येथील मिरचीच्या सातऱ्यावर काम करण्यासाठी जात होते. परंतु कानपा येथेच सातरा सुरु झाल्याने मजुरांचा वेळ व पैसाही बचत होत आहे. बोहरुन आलेल्या मिरचीचे देठ काढून महिलांकडून चांगली मिरची तयार केली जाते. सदर मिरचीच्या सातऱ्यावर डिसेंबर ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत काम सुरू असतो. या कालावधीत महिलांना शेतीवर काम नसल्याने मिरची कटाईच्या कामाने मजूरीचा प्रश्न मिटला आहे. चांगली मिरची तयार करुन दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठविल्या जात आहे. (वार्ताहर)