शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२५ पासून मनपा कंत्राटी कामगार संपावर

By admin | Updated: March 22, 2017 00:54 IST

किमान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी मनपामधील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील ...

विदर्भ प्रहार संघटनेचे नेतृत्व : किमान वेतन देण्याची मागणीचंद्रपूर : किमान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी मनपामधील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगार विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वामध्ये २५ मार्चपासून संपावर जाणार आहेत. स्थानिक चांदा क्लब ग्राऊंडवर विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर मनपामध्ये कार्यरत सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगारांची विदर्भ प्रहार संघटेनच्या अध्यक्ष हर्षल चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली यावेळी संपावर जाण्याचा निर्णय मनपामधील कंत्राटी कामगारांनी घेतला. मागील काही महिन्यापूर्वी मनपा आयुक्तानी कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या. मात्र अजुनही मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात आले नाही. तसेच वेतनसुद्धा थकीत आहे. त्यामुळे २५ मार्चच्या आत मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा मनपा निवडणुकीत बहीष्कार टाकण्याचा व संपावर जाण्याचा ईशारा मनपातील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगारांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)या आहेत मागण्याकिमान वेतन देण्यात यावे, १९ जानेवारीला मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे पालण करण्यात यावे, पी. एफ. व ई. एस.आयची अमंलबजावणी करण्यात यावी, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मनपा अस्थापनेत सामावून घेण्यात यावे, थकित वेतन देण्यात यावे.